IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्राची अंतिम नोटीस

IAS Pooja Khedkar Latest Update : 2 ऑगस्ट पर्यंत उत्तर न दिल्यास होणार पुढील कारवाई कार्मिक विभागाचा निर्वाणीचा इशारा. आता खेडकर यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने आता अंतिम नोटीस बजावली आहे.

पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत आवश्यक तो खुलासा करण्यासाठी त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे आता खेडकर यांच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने ही नोटीस बजावली आहे. पुढील तीन दिवसात त्यांना आपले उत्तर सादर करण्याच्या सूचना देण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी 2 ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर केले नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी (Colletor) कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केलेले अनेक 'प्रताप ' समोर आले आहेत. आयएएस होण्यासाठी त्यांनी आपल्या नावात तसेच राहण्याच्या पत्त्यात बदल करून फसवणूक केल्याच्या तक्रारी देखील आता समोर आल्या आहेत.

तसेच अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकाराची तसेच तक्रारींची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांची चौकशी देखील सुरू केली आहे. खेडकर यांच्या विरोधात होणाऱ्या आरोपांमुळे केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने त्यांना यावर खुलासा करण्यास सांगितले होते.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar: पूजा खेडकर कुटुंबाचा बारामतीत आणखी एक प्रताप; सातबारावर 'धोंडीबा'चे केले 'कोंडीबा'

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे प्रशिक्षण कालावधी देखील स्थगित करून त्यांना तातडीने मसुरी येथे बोलविण्यात आले होते. मात्र अद्यापही त्या तेथे गेले नसल्याचे समोर आले आहे.

पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला छळ केल्याची तक्रार खेडकर यांनी वाशिम येथे नोंदविली होती. त्याप्रकरणी त्यांचा जबाब घेण्यासाठी वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे.

या तक्रारीवर जबाब देण्यासाठी पुणे पोलिसांनी देखील आत्तापर्यंत तीन वेळा पूजा खेडकर यांना समन्स काढून जबाबासाठी बोलाविले आहे. मात्र त्यांचा फोन आऊट ऑफ कव्हरेज असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

IAS Pooja Khedkar
Pooja Khedkar : पूजा खेडकरांना अटकेची भीती? जामिनासाठी दिल्लीत धावाधाव

केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने खेडकर यांच्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल सादर केला आहे. त्यानंतर पुढील कारवाईपूर्वी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांची बाजू ऐकली जावी, म्हणून कार्मिक विभागानं त्यांना ही नोटीस बजावली आहे.

यामध्ये येत्या 2 ऑगस्टपर्यंत त्यांना त्यांची बाजू सादर करण्यास सांगितले आहे. या मुदतीत त्यांनी आपली बाजू न मांडल्यास कार्मिक विभाग पुढील कारवाई करण्यास तयार राहणार आहे. या नोटीस मुळे आता पूजा खेडकर यांच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com