NCP Alligation On BJP : 'BMC'तील कोविड घोटाळ्याची ईडी चौकशी होते तर पिंपरी महापालिकेतील का नाही ? राष्ट्रवादीचा सवाल

PCMC Political News : पिंपरी महापालिकेत भाजप सत्तेत होती. त्यांनी कोरोनाच नाही,तर इतरही को़ट्यवधी रुपयांचे घोटाळे केलेले आहेत.
PCMC, NCP
PCMC, NCP Sarkarnama
Published on
Updated on

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : मुंबई महापालिकेतील कोरोना घोटाळ्याची चौकशी होत असेल,तर आम्ही अनेकदा मागणी केलेल्या पिंपरी महापालिकेतील कोविड घोटाळ्याची ती का केली जात नाही असा हल्लाबोल महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी मंगळवारी (दि.२७) 'सरकारनामा'शी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी पिंपरीच नाही,तर पुणे महापालिकेतही भाजप सत्तेत असल्याने तेथील कोरोना गैरव्यवहाराची चौकशीची मागणी करूनही ती झाली नाही,तर त्याची साधी दखलही घेतली गेलेली नाही असंही गव्हाणे म्हणाले. मुंबई महापालिकेतील कोरोना घोटाळ्याची चौकशी होत असेल,तर आम्ही अनेकदा मागणी केलेल्या पिंपरी महापालिकेतील कोविड घोटाळ्याची ती का केली जात नाही अशी विचारणा त्यांनी केली.

PCMC, NCP
BMC Covid Scam : जैस्वाल यांच्यानंतर मुंबई महापालिकेचे आणखी दोन अधिकारी 'ईडी'च्या रडारवर

शिवसेनेची सत्ता होती, त्या मुंबई महापालिके(BMC)तील कोरोना घोटाळ्याची सध्या चौकशी सुरु असून त्यातून ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचे प्रयत्न आहेत. पण, भाजप सत्तेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोट्यवधी रुपयांचा कोरोना घोटाळा झाला. त्याच्या चौकशीची मागणी होऊनही ती झाली नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल केला.

पिंपरी महापालिकेत भाजप सत्तेत होती. त्यांनी कोरोनाच नाही,तर इतरही को़ट्यवधी रुपयांचे घोटाळे केलेले आहेत. त्याच्या चौकशीची मागणी अनेकदा करूनही ती का झाली नाही,ती का होत नाही,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे पुन्हा एकदा पिंपरीतील कोरोना घोटाळा चौकशीची मागणी करणार आहे असे ते म्हणाले.

PCMC, NCP
Pandharpur BRS News : बीआरएससारख्या छोट्या पार्टीला एवढं का घाबरता?; KCR यांचा राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना सवाल

घोटाळा सिद्ध होऊनही कारवाई नाही !

दरम्यान, फक्त ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी भाजप(BJP)ने मुंबई महापालिकेतील कोरोना घोटाळ्याची ईडी चौकशी सुरु केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा कोरोना घोटाळा झालेल्या पिंपरी-चिंचवडसह पुणे महापालिकांची मात्र ही चौकशी लागलेली नाही,हे विशेष आहे. पिंपरी महापालिकेतील कोरोना घोटाळा हा अजबगजब नमूना आहे. कारण एकही कोरोना रुग्ण दाखल नसताना म्हणजेच एकाही कोरोना रुग्णावर उपचार न करताही भोसरीत कोरोना सेंटरचालकाने तब्बल सव्वातीन कोटी रुपयांचे बिल पिंपरी पालिकेकडून उकळले आहे. हा घोटाळा सिद्ध होऊनही कुणावरच कसलीच कारवाई झालेली नाही.

PCMC, NCP
ECI Action Against Collector : कार्यशाळेला दांडी मारलेल्या जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांचे आयोगाने कान उपटले; मागितलं स्पष्टीकरण

पिंपरीतील कोरोना घोटाळ्याचे हे ठळक उदाहरण झाले. मास्क खरेदीतही असाच मोठा घोटाळा झाला आहे. दीड कोटी रुपयांचे मास्क झोपडपट्यांत वाटल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात त्याचे वाटप तेथे झालेले नाही. काही कोरोना सेंटर चालकांनी अव्वाच्या सव्वा दरआकारणी करून पालिकेला लुटले. मढ्यावरचे लोणी खाल्ले.असे एक नाही,अनेक गैरप्रकार कोरोना काळात पिंपरी महापालिकेत झाले. पण,त्याची ना दखल घेतली ना चौकशी लागली. कोरोना काळात पिंपरी महापालिकेत(PCMC) भाजप सत्तेत असल्याने व या घोटाळ्यात त्यांचाही सहभाग असल्याने त्याची चौकशी लागली नसल्याचे विरोधी पक्ष राष्ट्रवादीचा दावा आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com