Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi Latest NewsSarkarnama

यापुढे राहुल गांधींची सूडबुद्धीने चौकशी केल्यास `जेलभरो` आंदोलन; काँग्रेसचा इशारा...

Rahul Gandhi |Congress: तपासच करायचा असेल, तर तो राफेल खरेदीचा करावा...
Published on

पिंपरी : काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गेल्या तीन दिवसांपासून `ईडी` (ED) मार्फत चौकशी सुरु आहे. त्याच्या निषेधार्थ व राहूल गांधीच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड (Pimpri -Chinchwad) शहर जिल्हा कॉंग्रेसने बुधवारी (ता.१५ जून) सांयकाळी आंदोलन केले. देशात रोज वाढणारी महागाई आणि बेरोजगारीकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून राहूल गांधींच्या चौकशीचा हा फार्स सुरु केला असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम (Kailas Kadam) यांनी यावेळी सांगितले. (Rahul Gandhi Latest Marathi News)

Rahul Gandhi Latest News
मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही, हुकूमशाही, हिटलरशाही करायची आहे...

ज्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी खा. गांधी यांची चौकशी सुरु आहे, त्यात काहीच तथ्य नसल्याचा दावा डॉ. कदम यांनी केला. केंद्रातील भाजप (BJP)सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना तपासच करायचा असेल, तर तो राफेल खरेदीचा करावा, परदेशातून किती काळा पैसा आणला त्याचा करावा, असे आव्हान त्यांनी दिले. यापुढे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची सूडबुद्धीने चौकशी केली तर` जेलभरो` करू, असा इशारा त्यांनी दिला.

Rahul Gandhi Latest News
देहूच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल फडणवीस आणि भोसलेंनी बदलला...

सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असताना राहुल गांधी यांना तीन दिवस चौकशीच्या फेऱ्यात अडकवणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे, असे माजी नगरसेवक बाबू नायर यावेळी म्हणाले. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले. त्यात माजी महापौर कवीचंद भाट, माजी नगरसेवक बाबू नायर, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले तसेच छाया देसले आदींनी भाग घेतला. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात घोषणा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com