Wresters agitation, Sahard Pawar
Wresters agitation, Sahard PawarSarkarnama

Maharashtra News : दिल्लीतील आंदोलनाबाबत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत महत्वाचा निर्णय

Sharad Pawar : रेल्वे अपघाताची सखोल चौकशी करावी : शरद पवार

Maharashtra Kustigir Parishad : पुण्यात शनिवारी (ता. ३) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. या सभेला राज्यभरातील कुस्ती संघ आणि सहयोगी संघांशी संलग्न असलेल्या ४५ संघांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. या बैठकीत दिल्लीत सुरू असेलल्या महिला कुस्तीगीरांबात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

दिल्लीत येथे ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीगीरांचे (Agitation in Delhi) काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झालेली नाही. केंद्र सरकारने या महिला कुस्तीपटूंची दखलही घेतलेली नाही. आता या आंदोलकांना शेतकरी संघटनेसह विरोधक आणि क्रीडाजगतातूनही पाठिंबा वाढत आहे. दरम्यान, पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सभेत एक ठराव करण्यात आला आहे.

Wresters agitation, Sahard Pawar
Shrikant Shinde News : श्रीकांत शिंदेंनी हलके केले शिवसेनेच्या खासदारांचे टेन्शन; केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाचा दिला दाखला

या बैठकीत झालेल्या ठरावाबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी माहिती दिली. पवार म्हणाले, "दिल्लीत कुस्तीगीर मुलींवर जी काही अत्याचार झाल्याची तक्रार आहे, त्याची केंद्र सरकारने गांभिर्याने नोंद घ्यावी. दिल्ली सरकारने त्यात लक्ष घालावे. असा ठराव करण्यात आला आहे." यावेळी पवार यांनी रेल्वे दुर्घनेवरही भाष्य केले. या आपघाताची चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली."

शरद पवार म्हणाले, "ओडिशात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची चौकशी व्हावी. त्यातून जे काही समोर येईल. त्यावर केंद्र सरकारने उपाययोजना करावी." यानंतर त्यांनी लाल बहाद्दुर शास्त्रींचे उदाहण दिले. (Railway Accident)

ते म्हणाले, "लाल बहाद्दुर शास्त्री रेल्वे मंत्री होते. त्यावेळी एखदा रेल्वेचा अपघात झाला होता. त्यानंतर पुन्हा रेल्वेचा अपघात झाला. त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू राजीनामा देण्याच्या विरोधात होते. मात्र लाल बहाद्दुर शास्त्री यांनी नैतिक जाबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा दिला. हे उदाहरण देशाच्या समोर आहे. आता संबंधित मंत्र्यांनी त्यांना योग्य वाटेल ते करावे."

Wresters agitation, Sahard Pawar
Shrikant Shinde : संजय राऊतांच्या 'त्या' कृतीवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "वेड..."

नांदेडमध्ये (Nanded) मुलाची झालेली हत्या निंदनीय असल्याचे पवार म्हणाले. ते म्हणाले, "भीम जयंती साजरी केली मुलाची हत्या होत असेल तर हे अतिशय निंदनीय आहे. ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही. राज्य सरकारने या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी करावी. त्यानंतर दोषींना त्यांची जागा दाखवून द्यावी."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com