Exam : पुणे विद्यापीठाच्या 30 जानेवारीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या; 'ही' आहे पुढची तारीख

Exam : पुणे विद्यापीठाअंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
EXAM Student
EXAM StudentSarkarnama
Published on
Updated on

Exam : पुणे विद्यापीठाअंतर्गत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांची हिवाळी सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे.

मात्र, नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणुकीचे मतदान ३० जानेवारीला आहे. त्यामुळे ही मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी काही महाविद्यालये मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

EXAM Student
Devendra Fadnavis : "पुढील तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदललेला असेल" : फडणवीसांचा दावा!

त्यामुळे या एका दिवसाचे सर्व विद्याशाखांच्या सर्व अभ्यासक्रमांचे पेपर ३० जानेवारी ऐवजी आता रविवारी (ता.५) घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. या फेरबदलाचा निर्णय हा विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक (Nashik) या तिन्ही जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. तसेच उर्वरीत सर्व पेपर नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

EXAM Student
Employee agitation : राज्यातील विद्यापीठीय कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

या संबंधीचे प्रसिद्धीपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 30 जानेवारीला होणाऱ्या तब्बल 30 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संदर्भातील अपडेट विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

EXAM Student
Kasaba By-Election : भाजपकडून अजूनही सर्व्हे सुरूच, काँग्रेस नेते काश्मीरमध्ये

दरम्यान, राज्यात महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे मतदान ३० जानेवारीला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काही काही परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमकी कोणत्या परिक्षा आणि किती पेपरमध्ये बदल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com