Employee agitation : राज्यातील विद्यापीठीय कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

Employee agitation : गेल्या तीन वर्षांपासून मागण्या मान्य झाल्या नाहीत...
Employee agitation
Employee agitation Sarkarnama

Employee agitation : राज्यातील विद्यापीठीय कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे आता ते आंदोलनाच्या पावित्र्यात असून राज्यातील अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवकांची नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठक पार पडली.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संयुक्त कृती समिती स्थापन करून मागील शासन काळात संपाचे आयोजन करण्यात आलेले होते. तर याबाबतचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या दरम्यान, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख आणि महासचिव मिलिंद भोसले यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

Employee agitation
Vanchit vs Bhide Guruji : भिडे गुरुजींना विरोध करणाऱ्या 'वंचित' पदाधिकऱ्यांचा दिवस गेला पोलीस ठाण्यात

तसेच येणाऱ्या काळात सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द झालेला जीआर पुनर्जीवित करणे, त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगातील ५८ महिन्याची थकबाकी देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १ हजार ४१० विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, याबरोबरच विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावरील रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

Employee agitation
Politics : तीन दिवसांपैकी एक मिनीटही झोपलो नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला बंडखोरीदरम्यानचा किस्सा

याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने योग्य तो निर्णय १ फेब्रुवारी पर्यंत न घेतल्यास सेवक संयुक्त कृती समितीतर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर १४, १५ व १६ फेब्रुवारीपर्यंत निदर्शने, काळ्या फिती लावून काम करणे, एक दिवसाचा लाक्षणिक संप अशा प्रकारे आंदोलन करण्यात येईल, असं यावेळी सांगण्यात आलं आहे. मात्र, याची दखल न घेतल्यास २० फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्षांच्यावतीने देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com