पिंपरीत एक नाही, तर चार-चार `विशाल फटे`

शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना सव्वा आठ कोटी रुपयांना गंडा घातला आहे.
Vishal Phate Scam News
Vishal Phate Scam News Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या बार्शीच्या (Barshi Scam) विशाल फटे (Vishal Phate) या मिनी हर्षद मेहताच्या (Harshad Mehta) फसवणुकीचे प्रकरण सध्या राज्यभर गाजते आहे. असा एक नाही, तर चार विशाल फटे पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आढळून आले आहेत. त्यांनीही शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांना सव्वा आठ कोटी रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत इन्फीनॉक्स कॅपिटॉल कंपनीच्या चार संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vishal Phate Scam News
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचा मोठा निकाल; पलकसह तिघांना शिक्षा

पोलिसांच्या दररोजच्या प्रेसरिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाने २४ जानेवारीला दिलेल्या आदेशानुसार शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) हा चिटिंग व फोर्जरीचा गुन्हा २७ तारखेला दाखल केल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात तसे नसून आमच्याकडे आलेल्या थेट तक्रारीवरून तो नोंदविल्याचे या गुन्ह्याच्या तपासाधिकारी तथा ईओयूच्या पीआय वनिता कदम-धुमाळ यांनी 'सरकारनामा'ला शुक्रवारी (ता.२८ जानेवारी) सांगितले. मात्र, आरोपींनी नेमकी कशी फसवणूक केली, किती रिटर्न देऊ केला होता आदी माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. तसेच, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

Vishal Phate Scam News
मॅट्रीमोनी साइटवरील ओळख महागात, अडीचशे तरुणींची कोट्यवधींची फसवणूक व लैंगिक शोषण

पिंपरी-चिंचवडमधील या चार `विशाल फटें`नी गुंतवणूकदारांना परतावाच सोडा, त्यांची कोट्यवधीची गुंतवणूकही परत दिलेली नाही. आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची त्यांनी केलेल्या फसवणुकीचा व गुंतवणुकदारांचाही आकडा वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महेश मुरलीधर शिंदे (वय ४४,रा. इंद्रायणीनगर, भोसरी) या व्यावसायिकाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जय मावजी, निजय मेहता, निकुंश शहा आणि निलेश शांताराम वाणी या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींनी पिंपळे सौदागर या शहराच्या आलिशान भागातील एका मॉलजवळ आपले ऑफिस थाटले होते. तेथेच त्यांनी गेल्यावर्षी १ सप्टेंबरपासून ते आतापर्यंत ही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. आपल्या कंपनीच्या शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीतील गुंतवणुकीवर दरमहा आकर्षक फायदा करून देण्याचे आश्वासन फिर्यादी व इतरांना आरोपींनी दिले होते. ते, तर सोडा, पण त्यांची गुंतवणुकही परत न केल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com