Kasba Peth By Election : प्रभाग १५ मधील घटलेल्या मतदानाने भाजपची चिंता वाढवली...

Pune News : मतदानानंतर एकच चर्चा : कसब्यात काय होणार? प्रभाग १५ मध्ये कमी झालेले मतदान ठरणार निर्णायक!
BJP
BJP Sarkarnama

Pune Bypoll election : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.२६ फेब्रुवारी) मतदान पार पडले.

या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीनेही कंबर कसली. त्यामुळे आता कसबा मतदारसंघात कोण बाजी मारणार? हे मात्र, निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले. पोटनिवडणूक असताना देखील राजकीय पक्षांच्या अपेक्षेपेक्षा जवळपास १० टक्के जास्त मतदान झाले. या निवडणुकीतील आक्रमक प्रचार, मतदारसंघातील प्रश्‍न, हिंदुत्व यासारखे मुद्दे चर्चेत येत असताना मतदारांची मानसिकताही त्या नुसार बदलत गेली.

BJP
Mla Santosh Bangar News : बांगर शेलारांच्या पाया पडले, ठाकरे गट म्हणतो आता हेच करा ..

कसबा पोटनिवडणुकीसाठीची लढत अवघड होणार असल्याचे दिसताच भाजप आणि काँग्रेसने त्यांचा हक्काचा मतदार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्याला बऱ्यापैकी यशही आल्याचे दिसून येत आहे.

रविवारी (ता.२६) मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी बुथनिहाय विश्लेषण करत आहेत. त्यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून आम्ही किमान ५ ते ७ हजार मतांनी निवडून येऊ असा दावा करत आहेत.

निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करताना २०१९ मधील १५ हजार नावे यादीतून वगळली. त्याचा परिणाम कोणत्या पक्षावर होणार याचीही चर्चा सुरू होती. पण पोटनिवडणुकीत मतदान होताना प्रभाग क्रमांक १५ मध्ये पाच टक्के कमी मतदान झाले आहे. तर १६, १७, १८, १९ आणि २९ या प्रभागात मतदानाच्या टक्केवरीत अर्धा ते दोन टक्के फरक पडलेला आहे.

BJP
Vijay Wadettiwar News: … तर या देशात लोकशाही फक्त नावालाच राहील, असं का म्हणाले वडेट्टीवार ?

कसब्यात सर्वाधिक मतदार हे प्रभाग १५ मध्ये आहेत आणि तेथेच मागील विधानसभेला ४१ हजार ७७७ (५७ टक्के) मतदान होऊन त्यापैकी सुमारे ६८ टक्के मत भाजप मिळून २१ हजार २९ मतांचे मताधिक्य शनिवार, सदाशिव, नारायण, शुक्रवार पेठने दिले होते. यंदा या प्रभागात ५१.८९ टक्के म्हणजे ३७ हजार २३७ टक्के मतदान झाले आहे.

गेल्यावेळेच्या तुलनेत ४ हजार ५४० मतदान कमी झालेले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. तसेच यंदा नोटा या पर्यायाची चर्चा निवडणुकीत झाली होती. त्यामुळे ३७ हजार २३७ पैकी किती मत कोणाच्या पारड्यात जातात याकडे लक्ष लागलेले आहे.

विधानसभा २०१९ (आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो)

प्रभाग - एकूण मतदान - झालेले मतदान - टक्के

प्रभाग क्रमांक १५ - ७२४८० - ४१७७७ - ५७

प्रभाग क्रमांक १६ - २९३३६ - १५९१८ - ५४.२६

प्रभाग क्रमांक १७ -६१३२५ - २९५२७ - ४७.७६

प्रभाग क्रमांक १८ - ६१०४९ - २९३४१ - ४८.०४

प्रभाग क्रमांक १९ - २४७८३ - ११३८७ - ४५

प्रभाग क्रमांक २९ -४१७९७ - २२१०९ - ५२.६४

एकूण - २९०७७० - १,५०,०५७ - ५१.६४

BJP
Hemant Rasane News: मोठी बातमी ; राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भाजपचे उमेदवार रासने यांच्यावर गु्न्हा दाखल

विधानसभा २०२३

प्रभाग - एकूण मतदान - झालेले मतदान - टक्के

प्रभाग क्रमांक १५ - ७१७५६ - ३७२३७ - ५१.८९

प्रभाग क्रमांक १६ -३०१२८ - १६९९९ - ५६.४२

प्रभाग क्रमांक १७ - ५५९५० - २७६५३ - ४९.४२

प्रभाग क्रमांक १८ - ५६१८५ - २६६०० - ४७.३४

प्रभाग क्रमांक १९ -२२९७९ -१०६१३ - ४६.१६

प्रभाग क्रमांक २९ - ३८०५० - १९०५३ - ५०.१२

एकूण -२,७५,६७९ - १३८०१९ -५०.०६

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com