Hemant Rasane News: मोठी बातमी ; राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भाजपचे उमेदवार रासने यांच्यावर गु्न्हा दाखल

Kasba Peth Bypoll Election : रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
Hemant Rasane
Hemant RasaneSarkarnama
Published on
Updated on

Pune News : कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक मतदानात काल (रविवारी) भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केले होते, याप्रकरणी रासने यांच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमळाचे चिन्ह असलेले उपरणे परिधान करुन मतदान केलेल्या रासने यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली होती.

Hemant Rasane
BJP : लोकसभेसाठी भाजपचा असा आहे मुख्य अजेंडा ; देशभर दहा लाख..

निवडणूक अधिकाऱ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता रासने यांच्यावर काय कारवाई होते, हे लवकरच कळेल. रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

कसब्यात भाजप, काँग्रेससह इतर पक्षांसह अपक्ष असे १६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ५०.०६ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत कसब्यात 6.5 टक्के, 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के, दुपारी एक वाजेपर्यंत 18.5 टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत 30.5 टक्के, सायंकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान झाले होते.

Hemant Rasane
Kasba Peth Bypoll Election: भाजपच्या रासनेंनंतर आता आघाडीचे उमेदवार धंगेकर यांच्यावरही गुन्हा दाखल

कसबा (Kasba) विधानसभा मतदार संघ 2009 मध्ये अस्तित्वात आला. या मतदार संघात दोन लाख 75 हजार 428 मतदार आहेत. कसब्यात 2009 मध्ये 49.7 टक्के, 2014 मध्ये 61.57 टक्के, तर 2019 मध्ये 51.62 टक्के मतदान झाले होते.

कसबा पेठ पोटनिवडणूक अनेक कारणामुळे चर्चेत आहे. मतदार यादीत नाव नसल्याने काही ठिकाणी मतदारांना मतदान करता आले नाही. तर काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांना मतदानाचा अधिकार बजावण्यात आला नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. निकाल २ मार्चला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com