Maharashtra Covid 19 News: कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ; आरोग्य सचिवांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

Important Note to Health Secretary Officers: राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
Covid 19 news:
Covid 19 news: Sarkarnama
Published on
Updated on

Covid 19 News Update: राज्यातील कोरोनाच्या (Covid 19) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सचिवांनी काही महत्त्वाच्या सुचना जारी केल्या आहेत. या नुसार, कोरोना नियंत्रणासाठी प्रीकॉशन डोस देण्यावर भर द्यावा, टेस्टिंगचे प्रमाण वाढवा, आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, सीटी व्हॅल्यू 3 पेक्षा कमी असणारा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवा, प्रिव्हेंशन डोसची संख्या वाढवा, अशा सूचना आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत.

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. आरोग्य संचिवांच्या बैठकीत आरोग्य आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आरोग्य संचालक, सहसंचालक, सहायक संचालक, उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, महापालिका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांना हा सूचना देण्यात आल्या आहेत.

Covid 19 news:
Chhagan Bhujbal News : जातनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय प्रयत्न गरजेचे

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. 1 एप्रिलला देशात कोरोनाच्या (Coronavirus) 3824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या 6 महिन्यांतील ही सर्वाधिक संख्या आहे. गेल्या आठवड्याभरात ज्या प्रकारे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. ही वाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरची अलीकडे समोर येत असलेली सर्वाधिक वाढ आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com