Indapur Election : अजितदादांना नडलेल्या प्रदीप गारटकरांनी निकालाचीही वाट बघितली नाही; मतदान संपताच पुन्हा भिडले अन् फटाकेही फोडले!

Indapur Election : प्रदीप गारटकरांनी राजीनामा देत स्वतंत्रपणे नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्र आल्याने स्थानिक निवडणुकीत मोठे समीकरण बदलले आहे.
Pradeep Garatkar, Indapur Election, BJP Support, NCP Alliance
Pradeep Garatkar, Indapur Election, BJP Support, NCP AllianceSarkarnama
Published on
Updated on

Indapur Election : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान पार पडले. हे मतदान पार पडताच इंदापूरचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. तसेच 21 डिसेंबर रोजीच्या निकालातही गुलाल आपलाच असणार असा दावाही केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी गारटकर यांची ओळख होती. पण इंदापूरच्या नगराध्यक्षपदासाठी 'आयात’ उमेदवाराला विरोध दर्शवून त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि लगेचच निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. गारटकरांच्या पाठिंब्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एकत्र आले.

या सगळ्या घडामोडी म्हणजे एकप्रकारे अजित पवार यांनाच आव्हान मानले गेले. अशात आता मतदान संपताच गारटकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यानंतर बोलताना कार्यकर्ता आणि संघटनेचा सन्मान करा, हे आजच्या चुरशीच्या लढतीतून दाखवून दिले आहे, अशी गारटकर यांनी पुन्हा अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Pradeep Garatkar, Indapur Election, BJP Support, NCP Alliance
Indapur Politic's : शरद पवारांपासून दुरावलेले इंदापूरचे प्रवीण माने भाजपमध्ये जाणार; पक्षाला मिळाला मोठा चेहरा!

इंदापूरमधील लढत विशेष लक्षवेधी ठरली असून नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळाली. इंदापूरमधील राजकीय समीकरणांनी या निवडणुकीला वेगळे वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भरत शहा, तर कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रदीप गारटकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली होती.

भरत शहा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांचा पाठिंबा होता. तर कृष्णा-भीमा आघाडीच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांच्या माध्यमातून ‘राष्ट्रवादी’पुढे आव्हान निर्माण केले होते. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत या निवडणुकीत प्रचंड चुरस पहायला मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com