Indapur Politic's : शरद पवारांपासून दुरावलेले इंदापूरचे प्रवीण माने भाजपमध्ये जाणार; पक्षाला मिळाला मोठा चेहरा!

Praveen Mane News : विधानसभा निवडणुकीत प्रवीण माने हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छूक होते. मात्र, पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात उमेदवारी दिली, त्यामुळे माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
Praveen Mane
Praveen ManeSarkarnama
Published on
Updated on

Pune, 29 June : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि विधानसभा निवडणुकीपासून दुरावलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती दशरथ माने यांचे चिरंजीव पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. इंदापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिकेत असणाऱ्या मानेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याने तालुक्यात पक्षाला मोठा चेहरा मिळाला आहे.

प्रवीण माने यांचा येत्या 02 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात भाजप प्रवेश होणार आहे. आता माने यांच्यासोबत इंदापूर तालुक्यातील किती नेते भाजपमध्ये जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सोनाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दशरथ माने आणि प्रवीण माने हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छूक होते. मात्र, पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात उमेदवारी दिली, त्यामुळे माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून माने यांच्या राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता होती.

गेली काही दिवसांपासून प्रवीण माने हे भाजपत जाणार, अशी चर्चा रंंगली होती. मधल्या काळात त्यांच्या भाजप नेत्यांशी गाठीभेटी होत होत्या, त्यामुळे ते भाजपमध्ये जातील, असे संकेत मिळत होते. त्यानुसार प्रवीण माने यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. माने हे येत्या २ जुलै रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Praveen Mane
Sushilkumar Shinde : ‘माझे नाव कचऱ्याच्या पेटीत टाकलं तरी चालेल; पण...’ : सुशीलकुमार शिंदे भरसभेत असं का म्हणाले?

प्रवीण माने यांनी पुणे जिल्हा परिषदेत अडीच वर्षे बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. एकत्रित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागील 2019 च्या निवडणुकीत माने हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक होते. त्या वेळीही त्यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. तसेच, 2024 च्या निवडणुकीतही शरद पवारांकडून ऐनवेळी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवली.

Praveen Mane
BJP News : फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजप हायकमांड सोपवणार मोठी जबाबदारी...

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत पराभव झाला असला तरीही त्यांना 38 हजारापेक्षा जास्त मते मिळाली होती. त्यामुळे ती दुर्लक्षित करता येण्यासारखी नाहीत. भाजपलाही इंदापुरात प्रमुख चेहरा नव्हता, त्यामुळे भाजपने आता माने यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com