निमगाव केतकी (जि. पुणे) : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भाजपच्या मिशन लोकसभा कार्यक्रमांतर्गत त्या बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. बारामतीत विजय मिळविण्यासाठी भाजपकडून (BJP) जोरदार तयारी करण्यात येत आहे. सीतारामन या आज (ता. २३ सप्टेंबर) इंदापूर दौऱ्यावर येत आहे. मात्र, इंदापूर (Indapur) तालुक्यातील महत्वाच्या निमगाव केतकी गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निर्मला सीतारामन यांच्या स्वागताचा बॅनर लावण्यात आला आहे. त्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. (Indapur NCP put up the 'Welcome' banner of Nirmala Sitharaman)
निर्मला सीतारामन या शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी मंदिरात उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते आरती सेवा सप्ताह होऊन रक्तदान प्रमाणपत्राचे वाटप होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी निमगाव केतकी गावात सीतारामण यांच्या स्वागताचा लक्ष वेधून घेणारा बॅनर लावला. पण त्यावर उपरोधिकपणे टोले लगावणारा मजकूर छापण्यात आला आहे.
भारत देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत...
१) पेट्रोल-डिझेलने शंभरी पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
२) स्वयंपाकाच्या गॅसने हजारी पार केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
३) जनसामान्यांच्या रोजी-रोटीवर जीएसटी लावल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
४) रासायनिक खतांसह कृषी निविष्ठांनी उच्चांक गाठल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
५) पंधरा लाख रुपये भारतीयांच्या खात्यावर आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
६) वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पोहचविल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !
७) सुशिक्षीत बेरोजगार युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!
८) महाराष्ट्रासह अन्य राज्यांत लोकशाही मार्गाने आलेले सरकार हद्दपार करून हुकुमशाहीची सत्ता आणल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
९) बारामती लोकसभा हे एक विकासाचे रोल मॉडेलला पहिल्या वेळ भेट दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष झगडे यांनी निमगाव केतकी लावलेल्या बॅनरची आता तालुक्यासह पुणे जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. मात्र, पोलिसांनी तो बॅनर तेथून काढून टाकला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.