Dattatray Bharane News : विरोधकांना उसने अवसान घेऊन पाण्याचे श्रेय मिळणार नाही; भरणेंनी पाटलांना डिवचले

Indapur water issue : इंदापूर तालुक्यातील शेतीला व पिण्याचे पाणी आणण्यासाठी मी सक्षम आहे.
Harshvardhan Patil, Dattatreya Bharne News
Harshvardhan Patil, Dattatreya Bharne NewsSarkarnama
Published on
Updated on

Walchandnagar News : इंदापूर तालुक्यातील जनता खूप हुशार आहे. जनतेला खरे काय आणि खोटे काय हे समजते. इंदापूर तालुक्यातील शेतीला व पिण्याचे पाणी आणण्यासाठी मी सक्षम आहे. विरोधकांनी उसने अवसान घेऊन पाण्याचे श्रेय मिळणार नाही. त्यांनी विनाकारण पाण्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (Dattatreya Bharne) यांचे नाव न घेता त्यांना लगावला.

इंदापूरच्या (Indapur) पाणी प्रश्‍नावरुन गेल्या अनेक वर्षापासुन दत्तात्रेय भरणे व हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. बैठकीला आमदार दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक सदस्य हजर होते. बैठकीनंतर इंदापूरच्या पाण्यावरुन भरणे व पाटील यांच्यामध्ये श्रेयवादी लढाई सुरू झाली आहे.

Harshvardhan Patil, Dattatreya Bharne News
Maratha Reservation News : मराठा तरुण मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत, त्यांना नोकर भरतीत सामावून घ्या..

भरणे यांनी हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे झोड उडवली. भरणे म्हणाले, खडकवासला व नीरा डाव्या कालव्याचे पाणी शेती सिंचनासाठी आणण्यासाठी अजित पवार यांच्या माध्यमातून आमदार या नात्याने मी सक्षम आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये खडकवासला व निरा डावा कालव्याला आवर्तने सोडण्यासंदर्भात आपण तालुक्याचा आमदार या नात्याने पवार यांच्याकडे आग्रही मागणी केली.

या मागणीनुसार पवार यांच्या सुचनेवरुन जलसंपदा विभागाने इंदापूरच्या शेती सिंचनाच्या पाण्याचे नियोजन केले, असून शेटफळ तलाव शंभर टक्के भरण्याची सुचना दिल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न प्रलंबित आहे. मी ही २२ गावातील एक शेतकरी असून पाण्याबाबत काय समस्या असतात याची मला चांगली जाण आहे. तसेच लाकडी-निबोंडी परीसरातील शेतकऱ्यांसाठी अजित पवार यांच्या माध्यमातून लाकडी-निबोंडी योजना मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करुन घेतला आहे. त्याची निविदाही निघाली आहे.

इंदापूर तालुक्यातील जनतेला पिण्याचे व शेतीचे पाणी देण्यासाठी मी सक्षम आहे. विरोधकांनी विनाकारण यात श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. इंदापूर तालुक्यातील जनतेला खरे काय ? खोटे काय ? हे चांगले समजते. तालुक्यातील जनता खूप हुशार आहे. उसने अवसान घेऊन कधीच श्रेय मिळू शकत नाही. त्यांना कोण कामाचे, कोण बिनकामाचे हे पक्के माहित असल्याचे सांगून हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टोला लगावाल.

Edited by : Amol Jaybhaye

Harshvardhan Patil, Dattatreya Bharne News
Gopichand Padalkar: धनगर आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात; गोपीचंद पडळकरांनी थेट तारीखच सांगितली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com