Harshvardhan Patil On Bharne : इंदापूरचं पाणी पुन्हा तापणार; हर्षवर्धन पाटलांनी आमदार भरणेंवर टीका करत छेडला मुद्दा

Indapur Political News : '' तालुक्याच्या वाट्याचे पाणी गेले कुठे ? ''
Harshvardhan Patil - Dattatray Bharne
Harshvardhan Patil - Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Indapur : इंदापूर तालुक्यातील सणसर कट मधून गेल्या ९ वर्षामध्ये खडकवासला धरणाचे एक थेंब ही पाणी आले नाही. इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकऱ्यावर कोण अन्याय करीत आहे, असा सवाल करत भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी मंत्री आमदार दत्तात्रेय भरणे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. यामुळे येणाऱ्या काळामध्ये तालुक्यातील पाण्याचा प्रश्‍न पेटणार असल्याचे बोलले जात आहे.

दगडवाडी-निरवांगी (ता.इंदापूर) येथे नंदिकेश्‍वराच्या मंदिरामध्ये हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Harshvardhan Patil - Dattatray Bharne
Maratha Reservation News : बीड पोलिसांची आंदोलकांसोबतच जेवणाची पंगत ; संवेदनशील आंदोलन कौशल्याने हाताळले, होतेय कौतुक

यावेळी पाटील यांनी सांगितले, ३० कोटी रुपये खर्च करुन खडकवासल्याचे पाणी २२ गावातील शेतकऱ्यांना देण्यासाठी सणसर कट सुरु करण्यात आला होता. एक वर्षामध्ये ४ टीएमसी पाणी मिळत होते. सणसर कटमुळे भाटघरचे ४ टीएमसी पाणी कमी करण्यात आले आहे. मात्र, गेल्या ९ वर्षांमध्ये या कटमधून एक थेंब पाणी ही आले नाही. ९ वर्षे कागदावरती इंदापूरसाठी पाणी वाटप झाले आहे.

खडकवासला सिंचन आराखड्यामध्ये इंदापूर तालुक्यातील ४० हजार एकरासाठी पाणी देण्यात आले आहे. मात्र, तालुक्याच्या वाट्याचे पाणी गेले कुठे ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे .२२ गावातील शेतकऱ्यांना ९ वर्षामध्ये हक्काचे पाणी मिळत नसेल तर नवीन पाणी कुठून मिळणार याचा विचार होणे गरजेचे आहे.(Dattatray Bharne)

Harshvardhan Patil - Dattatray Bharne
Omraje Nimbalkar News : ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकरांचा महावितरणला इशारा; म्हणाले, '' आज शांततेत आंदोलन, उद्या...''

२०१४ पूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी कमी पडत नव्हते. मात्र ९ वर्षामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे. २२ गावातील शेतकऱ्यावर कोणी अन्याय केला याचा सोक्षमोक्ष नंदिकेश्‍वराचे साक्षीने लावावा लागेल असे सांगितले.यावेळी पाटील यांनी तालुक्यामध्ये धो-धो पाउस पडू दे अशी प्रार्थना नंदिकेश्‍वराकडे केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com