भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली; कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही : आरोग्यमंत्री सावंत

Tanaji Sawant News : कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, तानाजी सावंतांचे पिंपरी-चिंचवड येथे वक्तव्य
Tanaji Sawant News
Tanaji Sawant NewsSarkarnama

Tanaji Sawant News : जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांची, तर भारतातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याने कोरोनाला घाबरण्याचे काही कारण नाही. असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आज (ता.२४) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) केले. परंतू, धोका नको म्हणून जागृती करत आहोत, असेही ते पुढे म्हणाले. दरम्यान, असे वक्तव्य करणाऱ्या सावंतांनी, मात्र यावेळी मास्क लावलेला होता.

देशावर कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा घोंघावू लागले असले, तरी घाबरून न जाता बंधने पाळावीत, असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले. राज्यातील ९५ टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले असून ६० ते ७० टक्केजणानी बूस्टरही घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. पण काळजी म्हणून सोशल डिस्टन्स मेंटेन करणे आणि मास्कचा वापर करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. बंधने पाळून सण साजरे करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tanaji Sawant News
आरोग्यमंत्री सावंतांनी घेतली आमदार गोरेंची रुग्णालयात जाऊन भेट; प्रकृतीबद्दल दिली महत्त्वाची माहिती

राज्यातील साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा सरकारने तयार केला असून आता १८ वर्षापर्यंत आणि नंतर राज्यातील सर्व पुरूषांचाही तो तयार केला जाणार आहे. अशा प्रकारे नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस हे पहिले सरकार आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच केवळ आरोग्य डेटा गोळा करून सरकार थांबणार नाही, तर राज्यातील प्रत्येक नागरिकास मोफत आरोग्य तपासणी व उपचारहा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित दोन दिवसीय अटल महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी नारायणपूरचे नारायण महाराज, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप, शिबीराचे आयोजक व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, पालिकेचे सहआरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, माजी नगरसेविका सुनिता तापकीर, संदिप कस्पटे, विनोद तापकीर आदी उपस्थित होते.

Tanaji Sawant News
‘अजितदादा, तुमची वेळ चुकली...तो शपथविधी दुपारी झाला असता तर तुम्ही आज मुख्यमंत्री असता’ : भाजप आमदाराने फोडले गुपीत

गोरगरीब व तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या संकल्पनेतून या शिबीराची सुरूवात झाली असून हे त्याचे पाचवे वर्ष आहे, असे शंकर जगताप यांनी सांगितले. गत शिबीरात २ लाख नागरिकांची तपासणी होऊन ३१ हजार रुग्णांवर उपचार केले गेले. पावणेदोनशे रुग्णांची मोफत अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. यावेळच्या शिबीरात ४८ हॉस्पिटल आणि ५५० डॉक्टर्स व त्यांची टीम सहभागी झालेली असून त्यात दुर्धर आजारापर्यंतच्या सर्व तपासण्या आणि उपचार मोफत उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com