IPL: कोहली, रोहितच्या फॅनला अतिउत्साह नडला; पोलिसांशी वाद घातल्याने थेट तुरुंगात गेला

IPL|Virat Kohli|Rohit Sharma : मॅच पाहण्यासाठी खास तो साताऱ्याहून पुण्यात आला होता. सामना शेवटच्या रोमहर्षक टप्यात असताना रात्री साडेदहा वाजता तो तारेचे कंपाऊड ओलांडून मैदानात घुसला होता..
Virat Kohli, Rohit Sharma
Virat Kohli, Rohit SharmaSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : गहूंजे (ता. मावळ, जि. पुणे) क्रिकेट (Cricket) स्टेडियमवर मुंबई इंडियन (MI)आणि रॉयल चॅलेंज बॅंगलोर (RCB)यांच्यात काल (ता.९ एप्रिल) आयपीएल (IPL) ट्वेंटी-२०चा सामना झाला. त्यात मुंबईला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात एका सातारकर क्रिकेट शौकिनाचा अतिउत्साह त्याच्या चांगलाच अंगलट आला. मॅच चालू असताना तो मैदानात घुसला. त्याला बाहेर काढताना त्याने पोलिसांशी हुज्जत घातली व झटापट केली. गोंधळ घातल्यामुळे आणि सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी (Pimpri-Police) त्याला अटक केली.

Virat Kohli, Rohit Sharma
'आम्हीही हिंदुच मात्र देवांचा वापर निवडणुकीसाठी करत नाही'

अनेकवेळा असे उत्साही चाहते सामन्यांदरम्यान मैदानात घुसतात. त्यांचा पाठलाग करून त्यांना सुरक्षारक्षक बाहेर काढतात. पोलिसही त्यांच्याविरुद्ध कारवाई न करता त्यांना सोडून देतात. मात्र, कालच्या घटनेत दशरथ राजेंद्र जाधव (वय २६, रा. कासूर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा) या मैदानात घुसलेल्या तरुणाने परतताना पोलिसांसोबत वाद घातला. तोच त्याला महागात पडला आहे. त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

Virat Kohli, Rohit Sharma
ये दोस्ती गाण्यावर खडसे अन् सोमय्यांनी धरला ठेका; पण राऊतांचा फोटो पाहताच बदलले सूर...

दशरथ हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माचा मोठा फॅन आहे. त्यामुळे हे दोघे असलेल्या क्रिकेटची ही मॅच पाहण्यासाठी खास तो साताऱ्याहून पुण्यात आला होता. सामना शेवटच्या रोमहर्षक टप्यात असताना रात्री साडेदहा वाजता तो तारेचे कंपाऊड ओलांडून मैदानात घुसला. त्याने शेवटच्या काही ओव्हरमध्ये फलंदाजीस आलेल्या विराटशी हात मिळवण्याचा प्रयत्न केला. नंतर तो फिल्डिंग करीत असलेल्या रोहितच्या दिशेने चालला होता. तेव्हा त्याला पकडण्यात येऊन पुन्हा मैदानाबाहेर म्हणजे स्टेडियममध्ये आणण्यात आले. यावेळी त्याने पोलिसांशी वाद घालून झटापटही केली. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई (एफआयआर दाखल) करावी लागली, असे तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यातून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com