ये दोस्ती गाण्यावर खडसे अन् सोमय्यांनी धरला ठेका; पण राऊतांचा फोटो पाहताच बदलले सूर...

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, 'आ देखे जरा किसमे कितना है दम
Eknath Khadse, Kirit Somaiya, sanjay raut
Eknath Khadse, Kirit Somaiya, sanjay rautsarkarnama

मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे (BJP) दोन मोठे नेते एकाच मंच्यावर दिसणार आहेत. एका मराठी मनोरंजन वाहिनीवरील कार्यक्रत अनेक राजकीय मंडळी हजेरी लावताना दिसत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) एकत्र दिसणार आहेत.

एक मराठी वाहीनीवरील कार्यक्रमात या दोघांनी हजेरी लावली. त्या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच खडसे आणि सोमय्या यांची एंट्री होते. यावेळी त्यांच्या एंट्रीदरम्यान 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत असते. या गाण्यावर ते दोघेही मिठी मारुन डान्स करताना दिसत आहे. यानंतर ते दोघेही किचनमध्ये जेवण बनवत असताना कार्यक्रमाचे सूत्रसंचालक त्यांच्यासोबत मजेशीर खेळ खेळताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Eknath Khadse, Kirit Somaiya, sanjay raut
तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा ; राऊताचं नवं टि्वट

कार्यक्रमाध्ये या दोघांना काही फोटो दावले जातात. ते फोटो पाहून तुम्हाला कोणते गाणे आठवते हे तुम्ही सांगायचे असा हा गेम असतो. त्यानंतर स्क्रीनवर शिवसेना नेते संजय राऊतांचा एक फोटो दाखवला जातो. तो पाहिल्यावर खडसे लगेचच त्यावर प्रतिक्रिया देत गाणे म्हणायला सुरुवात करतात. 'आ देखे जरा किसमे कितना है दम', असे गाणे ते यावेळी म्हणतात.

Eknath Khadse, Kirit Somaiya, sanjay raut
पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणार नाही : परबांचा निर्णय

तर सोमय्या राऊतांचा फोटो पाहिल्यानंतर 'नो कमेंट्स' असे म्हणतात. त्यानंतर पुढे सोमय्या यांनी 'साफसफाईला सुरुवात केली आहे, असे मिश्किलपणे म्हणतात. त्यामुळे उपस्थितांमध्ये लोकांमध्ये एकच हशा पिकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com