Pune Latest News Politics : 'ही तर निष्ठेची हत्या'; धंगेकरांना उमेदवारी जाहीर होताच बागुल संतापले

Latest lok sabha election Pune News : गेली 40 वर्षे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून पक्षाचे काम केले. त्याचे आम्हाला काय फळ मिळाले,? एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे? काँग्रेसवर कोणी केली ही टीका
Aba Bagul
Aba BagulSarkarnama
Published on
Updated on

Aba Bagul Pune loksabha News Update : गेली 40 वर्षे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ राहून पक्षाचे काम केले. त्याचे आम्हाला काय फळ मिळाले, असा प्रश्न माजी उपमहापौर आणि काँग्रेसकडून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे आबा बागुल (Aba Bagul) यांनी विचारला. लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी करतानाच कार्यकर्ते, मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही बागुल यांनी सांगितले.

काँग्रेसने लोकसभेसाठी कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. धंगेकर यांना देण्यात आलेल्या उमेदवारीमुळे बागुल हे नाराज झाले आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे एकीकडे न्याय यात्रा काढत आहेत. मात्र, दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतांवर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न बागुल यांनी उपस्थित केला आहे. Latest Political News

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून माजी उपमहापौर आबा बागुल हे प्रबळ दावेदार होते. गेली चाळीस वर्षे आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, त्याचे फळ म्हणून लोकसभेची उमेदवारी नाकारली का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. ते चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. Current News About Maharashtra Politics

दुसऱ्या पक्षातून येऊन जेमतेम दीड वर्ष होत नाही ते आमदार झाले. मात्र, त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी (Loksabha Election Updates) देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत. मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे. त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) पराभूत झालेले आहेत. तसेच जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल (Aba Bagul) यांनी लक्ष वेधले.

Aba Bagul
Supriya Sule News : "रोहित अन् युगेंद्र पवार दडपशाहीचा सामना करताहेत," सुळेंनी थेट पोलिस अधीक्षकांना लिहिलं पत्र

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस (Congress) नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले, ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे. त्यामुळे आम्ही निष्ठावंतांची बैठक घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार आहे. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा, असेही ते म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R

Aba Bagul
Loksabha Election 2024 News : धंगेकरांच्या उमेदवारीने काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर; निष्ठावंतांना डावलल्याचा आबा बागुलांचा आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com