J P Nadda In Pune : जे पी नड्डांची बापटांच्या घरी भेट; आठवणींना उजाळा...

J P Nadda meet with Girish Bapat Family : बापट कुटुंबियांशी चर्चा
J P Nadda meet with Girish Bapat Family
J P Nadda meet with Girish Bapat FamilySarkarnama

J P Nadda meet with Girish Bapat Family : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कालच्या मुंबईतल्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आज ते पुण्यात होते. पुण्याच्या भाजप प्रदेश कार्यकारणीच्या (BJP State Committee) बैठक पार पडल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांशी (BJP Workers) संवाद साधला. भाजप सरकारची कामे पुढे न्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.

J P Nadda meet with Girish Bapat Family
Karnataka CM: 'या' सहा कारणांमुळे सिद्धरामय्या ठरले कर्नाटकचे 'किंग'!

दिवसभरातल्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी भाजपच्या दिवंगत नेते व पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जाऊन, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत गिरीश बापट यांच्या निवासस्थानी जे पी नड्डा यांनी सांत्वन पर भेट दिली. बापट यांच्या प्रतिमेला अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली.

J P Nadda meet with Girish Bapat Family
D. K. Shivakumar: ...म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसनं रद्द केला तीन उपमुख्यमंत्री पदाचा 'फॉर्म्यूला'

यावेळी जे पी नड्डा (Jp Nadda) यांनी बापट कुटुंबातल्या सदस्यांशी संवाद साधला. गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पुण्याचे खासदार म्हणून केलेले कामं, त्यांची संसदेतली खासदार म्हणून बजावलेली भूमिका इत्यादी गोष्टींच्या आठवणी जागल्या गेल्या. बापट यांच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे देखील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com