D. K. Shivakumar: ...म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसनं रद्द केला तीन उपमुख्यमंत्री पदाचा 'फॉर्म्यूला'

Karnataka Congress : मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्यांची बाजी
Siddaramaiah, Mallikarjun Kharge, D. K. Shivkumar
Siddaramaiah, Mallikarjun Kharge, D. K. ShivkumarSarkarnama
Published on
Updated on

Congress Politics : कर्नाटकमध्ये तब्बल १३५ जागा जिंकल्यानंतर काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करणार आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार अडून बसले होते. आता पक्षश्रेष्ठींना शिवकुमार यांचे मन वळविण्यात यश आले आहे. त्यामुळे इतर राज्यात काँग्रेसमध्ये झालेल्या बंडाळीचा धोका कर्नाटकमध्ये टळला असल्याचे दिसून येत आहे.

देशभरात २०१४ नंतर काँग्रेसला (Congress) उतरती कळा लागली आहे. सत्ता असूनही राजस्थानमध्ये काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. विविध कारणांनी अनेक बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरल्याने काँग्रेसला एकापाठोपाठ एक पराभव स्वीकारावे लागले आहेत. अशा वातावरणात कर्नाटक राज्यात मात्र काँग्रेसला एकहाती सत्ता आणण्यात यश आले आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांचा सिंहाचा वाटा आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले शिवकुमारांची नाराजी काँग्रेसने दूर केली. आता शिवकुमार (D.K. Shivakumar) कर्नाटकचे उपमुख्यंमंत्री होणार असले तरी त्यांचा मंत्रीमंडळासह राज्यातील दबदबा कायम ठेवण्याचा काँग्रेसने प्रयत्न करणार आहे. यातून काँग्रेसने इतर राज्यात असलेल्या पक्षांतर्गत वाद कर्टनाटकमध्ये शमविण्यात यशस्वी झाले आहे.

Siddaramaiah, Mallikarjun Kharge, D. K. Shivkumar
Karnataka CM: 'या' सहा कारणांमुळे सिद्धरामय्या ठरले कर्नाटकचे 'किंग'!

मुख्यमंत्री पदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी हक्क सांगितला होता. निवडणुकीदरम्यान, त्यांनी आपल्या आकांक्षाला मुरड घातली होती. निकालानंतर मात्र दोघेही मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले. दरम्यान, देशातील राजकारणासह उत्तर पूर्व भागातील राज्य, पंजाब, २०१९ मध्ये कर्नाटक आणि सध्या राजस्थानमधील स्थिती पाहता काँग्रेस विचारपूर्वक पावले टाकत होती. कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळणार, असा आत्मविश्वास होता. त्यामुळे येथे 'सोशल इंजिनिअरिंग' करण्यासाठी एकापेक्षा अधिक उपमुख्यमंत्री पद देण्याची शक्यता होता.

आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडविण्यात यश आले होते. त्यानुसार सिद्धरामय्या पुन्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पद देण्यात येणार आहे. त्यास शिवकुमारांनी सहमती दर्शविली आहे. हा फॉर्म्यूला राबविताना काँग्रेसने मात्र उपमुख्यमंत्री होणाऱ्या शिवकुमारांचे पक्षासह राज्य आणि मंत्रीमंडळातील स्थान कमी होणार नाही, याची दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे.

Siddaramaiah, Mallikarjun Kharge, D. K. Shivkumar
DK Shivkumar on Karnataka: उपमुख्यमंत्री पदासाठी कसे तयार झाले डीके शिवकुमार? 'हे' आहे कारण

देशातील काही राज्यात काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. ते कर्नाटकमध्ये (Karnataka) टाळण्यासाठी 'सोशल इंजिनिअरिंग'साठी काँग्रेस लिंगायत, वक्कलिगा आणि मुस्लिम समाजाला उपमुख्यमंत्री पद देण्याची चर्चा होती. आता मात्र शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री असणार आहेत. उपमुख्यंत्री असणाऱ्या शिवकुमार यांना राज्याचे महत्वाचे खाते मिळणार आहे. मंत्रीमंडळात शिवकुमारांच्या गटातील काही आमदारांचा समावेश होणार आहेत. त्यांनाही काही महत्वाची खाती देण्यात येणार आहेत.

Siddaramaiah, Mallikarjun Kharge, D. K. Shivkumar
CM Naveen Patnaik: अन् ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी थेट वडिलांचे स्मारकचं हटवण्याचे आदेश दिले...

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत शिवकुमार यांच्याकडेच कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद राहणार आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शनिवारी (ता. २०) शपथ घेणार आहेत. त्यावेळी शिवकुमार यांच्याकडे कुठली महत्वाची खाती असतील, हे स्पष्ट होईल. "काँग्रेस माझी आई आहे. काहीही झाले तरी मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत २८ पैकी कमीत कमी २० जागा काँग्रेसला मिळवून देणार आहे," असा दावाही कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com