Ravindra Dhangekar:"...तर राजकीय जीवनाची चिरफाड"; एकनाथ शिंदेंचा संदर्भ देत धंगेकरांनी कोणाला दिला इशारा?

Ravindra Dhangekar: गोखले बिल्डर यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द केल्यानंतर आज शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी आज जैन बोर्डिंगला भेट दिली.
Ravindra Dhangekar Eknath Shinde
Ravindra Dhangekar Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ravindra Dhangekar: गोखले बिल्डर यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द केल्यानंतर आज राजकीय घडामोडींना वेग आला. शिवसेनेचे महानगर प्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज जैन बोर्डिंगला भेट दिली. जैन मुनी आचार्य गुरूदेव गुप्तीनंदीजी महाराज यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Ravindra Dhangekar Eknath Shinde
Top 10 News: राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणी डान्स ते मुख्यमंत्र्यांचे भाष्य अन् गोरेंच्या घोषणेमुळे अस्वस्थ मोहिते पाटील

...तर राजकीय जीवनाची चिरफाड

जैन धर्माबरोबर मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. हा समाज व्यापारी असून अहिंसेविरोधातील आहे. या समाजाकडे कायम दानशूर म्हणून बघितले जाते. जैन बोर्डिंगच्या विटेला ही मी हात लावू देणार नाही हे मी पहिल्याच दिवशी सांगितले होते. मी समाजाला शब्द दिला होता तो आज मला खरा ठरल्याचे जाणवत आहे. याचा मला आनंद आहे. मला चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढण्याची शक्ती भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच मिळाली.

कारण, संत आणि देव यांच्याशिवाय देश चालत नाही. माझी कोणाच्याही कुटुंबाशी लढाई नाही. मी आजही विकृतीविरोधात बोलतोय, भाजपविरोधात नाही. नीलेश घायवळ कसा पळाला, तो विषय अजून संपलेला नाही. या लढाईत एकनाथ शिंदे यांनी मला कुठेही अडवलेलं नाही. या प्रकरणाचे दोन अंक पूर्ण झाले असून, तिसरा अंक सुरू झाला तर, राजकीय जीवनाची चिरफाड करेल असा इशारा धंगेकर यांनी दिला.

Ravindra Dhangekar Eknath Shinde
II Phase SIR: संपूर्ण देशात होणार SIR पण 'या' राज्याला वगळलं! CEC ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं कारण

धर्मादाय आयुक्त दोषी - आंबेडकर

जुन्या ट्रस्टच्या जागा विकण्याची नवीन प्रकार सुरु झाला आहे. बॉम्बे ट्रस्ट ॲक्टनुसार काही बदल करायचा असेल तर त्यात उच्च न्यायालयाला अधिकार आहेत. राज्य शासनालाही अधिकार नाहीत. या ट्रस्टचे ट्रस्ट डीड वाचले आहे, त्यात ट्रस्टची जागा विकण्याचा अधिकार विश्‍वस्तांना दिलेला नाही. धर्मादाय आयुक्तांनी यासाठी परवानगी देताना धर्मादाय आयुक्तांनी हे ट्रस्ट डीड वाचले आहे का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

Ravindra Dhangekar Eknath Shinde
Uddhav Thackeray: अ‍ॅनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन! उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा निशाणा

एखाद्या व्यक्तीने आपली जागा धर्मादाय आयुक्तांकडे दिल्यानंतर ती जागा शासनाच्या मालकीची होती. पण त्यात बदल करण्याचा अधिकार शासनालाही नाही. धर्मादाय आयुक्तांकडे उद्या (ता. २८) सुनावणी होणार आहे. त्यात हा व्यवहार रद्द केला तर हे प्रकरण उच्च न्यायालयात जाईल. न्यायालय त्यांच्यावर ताशेरे ओढणार आहे हे त्यांना माहिती आहे. ट्रस्टची स्थापना ही चांगल्या हेतूने केली जाते. पण आता त्याचा दुरुपयोग करत आहेत. जैन बोर्डिंगच्या विषयात धर्मादाय आयुक्तांना दोषी धरले पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com