Uddhav Thackeray: अ‍ॅनाकोंडाचा मुंबई गिळण्याचा प्लॅन! उद्धव ठाकरेंचा मोदी-शहांवर पुन्हा निशाणा

Uddhav Thackeray: वरळीत डोममध्ये आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन भाषण केलं.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Published on
Updated on

Uddhav Thackeray: मुंबईत मतदार याद्यांमधील घोळ समोर आणण्याच्या उद्देशानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या आज वरळीच्या डोममध्ये निर्धार मेळावा घेतला. यावेळी आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनद्वारे मतदार याद्यांमधील घोळ समोर आणले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मोदी-शहांवर निशाणा साधला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी मुंबई गिळायला आलेला अ‍ॅनाकोंडा असं संबोधलं.

Uddhav Thackeray
II Phase SIR: आता दुसऱ्या टप्प्यात 12 राज्यांत होणार SIR! महाराष्ट्रात मतदार याद्यांची पुनर्पडताळणी होणार का? ECIनं केलं जाहीर

उद्धव ठाकरे म्हणाले, "आदित्य ठाकरेंनी वरळीतील ज्या मतदार याद्यांचा घोळ तुम्हाला दाखवला त्यावर लक्ष ठेवायचं काम आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात करायचं आहे. याची सुरुवात मुंबईतून करायची आहे. कारण मुंबईवरती कोणाचा डोळा आहे हे तुम्हाला माहिती आहे, खास करुन दोन व्यापाऱ्यांचा! यांपैकी आजच एक जण येऊन गेला. आज काय योगायोग आहे, दोन बातम्या मी वाचल्या एक भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन आणि ही जागा कशी पटकावली आणि जिजामाता उद्यानात लवकरच अ‍ॅनाकोंडा येणार ही बातमी. अ‍ॅनाकोंडा म्हणजे सर्वकाही गिळणारा साप. तो आज इथं येऊन गेला भूमिपूजन करुन गेला. त्याला मुंबई गिळायची आहे"

Uddhav Thackeray
BJP Office: भाजपच्या नुतन प्रदेश मुख्यालयाच्या जागेवरुन वाद! BMCचा निवासी भूखंड 11 दिवसांत हस्तांतरीत; नेमकं प्रकरण काय?

गाढवही गेलं...

भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन कार्यक्रमात अमित शहांनी ठाकरेंच्या घराणेशाहीवर भाष्य केलं. त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, भूमिपूजन करायला आलाय ना तर फोड ना नारळ दगडावर, नाहीतर डोक्यावर फोड एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराणेशाहीवर टीका. म्हणजे याचं कार्ट हे क्रिकेट बोर्डाचं अध्यक्ष झालं ते त्याच्या क्रेडिटनं झालं, मेरिटनं झालं आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची. मला त्या अब्दालीला मला सांगायचं आहे. आम्ही आमच्या आई-वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याचे परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत. संजय राऊत म्हणाले तसं तुमच्या ब्रह्मचाऱ्याची पिलावळ म्हणजे आमची घराणेशाही नाही. भाजची अवस्था गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं अशी झाली आहे"

Uddhav Thackeray
Chitra Wagh : ठाण्यातील चित्रा वाघ यांच्या एंट्रीने अनेकांची डोकेदुखी वाढली; अ‍ॅक्शन मोडवर आल्याने राजकीय फटाके फुटणार !

बिनधास्त फटकावा!

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत. मतदार यादी फोटोसह त्याच्या हातात असली पाहिजे. इतकं नाही तर नुसता फोटोसहीत नाही तर चेहऱ्यानिशी ओळखणारा पोलिंग एजंट तिथं असला पाहिजे. जर का तुम्हाला वाटलं की हा गडबड आहे, ही व्यक्ती बोगस आहे. तर बिनधास्त त्याला फटकावा. कारण वारंवार आपण सांगून जर निवडणूक आयोग जर त्याची दखल घेणार नसेल तर मग आम्ही बोगस मतदाराला मतदान करु देणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी उपस्थित उपजिल्हा प्रमुखांना सूचना केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com