बाबासाहेब पुरंदरेंवरील आरोपप्रकरणी जेम्स लेनचा मोठा खुलासा...

Babasaheb Purandare|James Laine| Raj Thackeray : लेखक जेम्स लेनने एका मुलाखती दरम्यान स्पष्टीकरण दिले आहे.
Babasaheb Purandare, James Laine
Babasaheb Purandare, James LaineSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या आणि त्यानंतर ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्टवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत जातीयवादाचे आरोप लावले होते. या भाषणात राज यांनी जेम्स लेननं लिहलेल्या वादग्रस्त पुस्तकावरून राज्यात पवारांनी जातीयवाद पेरल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडसारखी संघटनाही १९९९ नंतरच उदयास आली असल्याचे म्हटले होते. यावर राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडकडून आक्षेप घेत बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांनी जेम्स लेनच्या पुस्तकाचे कौतुक केल्याचं म्हटले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर मनसेकडून पुरंदरे यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाला पाठवलेले पत्र समोर आणल्याने या प्रकरणास आणखी एक वळण लागलं आहे.

Babasaheb Purandare, James Laine
जेम्स लेननी त्या पुस्तकातील एक पान फाडून टाकावे; आमचे काही म्हणणे नाही : आव्हाड

ज्या पुस्तकावरून हा वाद सुरू आहे त्या पुस्तकाचा लेखक जेम्स लेननंही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो याबाबत म्हणाला की, बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी आपली कुठलीही चर्चा झाली नाही, असे त्याने सांगितले. इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत जेम्सने हे स्पष्ट केले आहे. आपण लिहलेल्या या पुस्तकात कुठलाही ऐतिहासिक दावा केला नसून या पुस्तकासाठी कुणीही आपल्याला माहिती पुरवली नसल्याचे जेम्सने या मुलाखतीत म्हटले आहे.

पवारांनी पुरंदरे यांनीच जेम्सला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती पुरविल्याचा आरोप केला होता. त्यावर राज यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं आणि महाराष्ट्रात जातीयवाद आणल्याचा आरोप केला होता. त्याबरोबरच चुकीचा इतिहास कोणत्या पानावर सांगितला गेला ते सांगा, असे आव्हानही राज यांनी केले होते. यावर काहीच दिवसात जेम्सचं स्पष्टीकरण पुढे आले आहे. जेम्स म्हणला की, माझे लिहलेले पुस्तक Shivaji Hindu King In Islamic India पुस्तकात कुठलाही ऐतिहासिक दावा केलेला नाही. मी केवळ कथा सांगितली असून त्यास ऐतिहासिक तथ्य नसल्याचे त्याने स्पष्ट केले. याबरोबर पुरंदरे यांच्याशी एका शब्दानेही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

Babasaheb Purandare, James Laine
डॉ. आंबेडकर जयंती कार्यक्रमात सहभागासाठी सुजात आंबेडकरांना परवानगी नाकारली...

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे बाबासाहेब पुरंदरे हे समर्थक होते. छत्रपती शिवाजी महाराज महान वीर होते. मात्र, त्यांचे साहित्य विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय विवादाचं साधन झाल्याची खंत वाटते, अस म्हणत मी जे पुस्तक लिहिलंय त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की, ज्यांनी टीका केली आहे त्यांना या पुस्तकातील कथानक समजलेले नाही, असे जेम्स म्हणाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com