जावडेकर म्हणाले; मोदींच्या धोरणामुळे तीनशेचा ‘एलईडी’ बल्ब आता सत्तर रूपयांना मिळतो

देश कार्यकारिणीत बोलताना जावडेकर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील योजनांचा आढावा घेतला.
प्रकाश जावडेकर
प्रकाश जावडेकर सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीसाठी मोठी ताकद आहेत तर पंतप्रधान मोदी यांच्यावरील भारतीय जनतेचा विश्‍वास ही पंतप्रधान मोदींची खरी ताकद आहे.त्यामुळे गेल्या सात वर्षात पंतप्रधान मोदी यांनी राबविलेल्या योजना सामान्य माणसापर्यंत पोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कष्ट घेतले पाहिजेत, असे मत भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज व्यक्त केले.

प्रकाश जावडेकर
कंगनावर देशभरात गुन्हे दाखल, पण नागपूरकरांनी केली ‘ही’ अजब मागणी

प्रदेश कार्यकारिणीत बोलताना जावडेकर यांनी केंद्र सरकारच्या गेल्या सात वर्षातील योजनांचा आढावा घेतला. गेल्या सात वर्षात देशात प्रचंड मोठे काम उभे राहिले आहे. सात वर्षापूर्वी तीनशे रूपयांना असलेला ‘एलईडी’ बल्ब पंतप्रधान मोदींच्या धोरणामुळे अवघ्या सत्तर रूपयांना मिळू लागला आहे.मात्र, याची कल्पनाही फारशी कुणाला नाही, असे जावडेकर यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

प्रकाश जावडेकर
भाजपवासी मधुकर पिचड आदिवासींच्या राजकारणातून साईड ट्रॅक?

‘यूपीए’ सरकारने ७० हजार कोटी रूपयांचे कर्ज एकदा माफ केल्याचे सांगण्यात येते.कित्येत वर्षे त्याचा गवगवा करण्यात आला. मात्र, मोदी सरकारच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रूपयांच्या माध्यमातून सात लाख कोटी रूपयांची मदत केली जात आहे. थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होत आहेत. पेयजल योजना, आयुष्यमान भारत योजना, चाळीस कोटी बँक खाती उघडण्याची योजना असो व उज्वला गॅस जोडणी योजना. अशा अनेक योजना प्रत्यक्षात आल्या आहेत. या योजनांची नेमकी माहिती कार्यकर्ता या नात्याने आपण समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवल्या पाहिजेत, असे जावडेकर यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात देशाच्या पातळीवर झालेले नियोजन, मोफत अन्नधान्य देण्याची योजना महत्वपूर्ण ठरली. लसीकरणात ज्या पद्धतीने देशाने आघाडी घेतली आहे त्यातून जगभरात पंतप्रधान मोदी यांचे कौतुक होत आहे. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात मास्क बनविण्याची आपली क्षमता नव्हती. मात्र, झटपट निर्णय आणि तातडीने अंमलबजावणी यामुळे जगातील ८० देशांना आपण लस पुरवत आहोत.अभिमान वाटावा, अशा या साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी आहे.या योजना आणि त्याचे परिणाम लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे काम आपण तितक्याच जिद्दीने करायला हवे, असे आवाहन जावडेकर यांनी केले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com