Video Jayant Patil : मोठी बातमी! क्रेनमधून पडता-पडता जयंत पाटील, अमोल कोल्हे, रोहिणी खडसे बचावले; नेमकं काय घडलं?

Shiva Swarajya Yatra : राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 'शिवस्वराज्य यात्रा' काढली आहे. तेव्हाच एकाठिकाणी क्रेनमधून खाली पडताना बचावले आहेत.
Jayant Patil| Amol Kolhe| Rohini Khadse
Jayant Patil| Amol Kolhe| Rohini KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jayant Patil and Amol Kolhe Narrowly Escaped Falling :आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( शरदचंद्र पवार ) राज्यभरात 'शिवस्वराज्य यात्रा' काढली आहे. या यात्रेची सुरूवात आजपासून ( 9 ऑगस्ट ) शिवनेरी किल्ल्यावरून होईल. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून खाली उतरताना मोठी दुर्घटना घडता-घडता टळली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख क्रेनमधून पडता-पडता बचावले आहेत. यात कोणालाही दुखापत झाली नाही.

नेमकं घडलं काय?

शिवनेरी किल्ल्यावरून 'शिवस्वराज्य यात्रे'ची सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी जयंत पाटील, अमोल कोल्हे ( Amol Kolhe ), रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख क्रेनच्या सहाय्यानं वरती गेले होते.

Jayant Patil| Amol Kolhe| Rohini Khadse
Jayant Patil News :...त्यामुळे राज्य सरकारला सर्वजण लाडके झाले; जयंत पाटलांचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत होती. त्यावेळी अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्यानं ती एका बाजूला झुकली. तेव्हा, त्यातून खाली पडता-पडता जयंत पाटील, कोल्हे, खडसे आणि शेख बचावले. यानंतर हळू-हळू क्रेन खाली आणण्यात आली आणि सगळ्यांना सुखरूप खाली उतरविण्यात आलं. यात कोणालाही दुखापत झाली नाही.

पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतून जाणार...

यात्रेबद्दल माहिती देताना जयंत पाटल यांनी सांगितलं होतं, "महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यापासून राज्य अधोगतीकडे गेलेले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. शेजारचे राज्य आपल्या तरुणांच्या हातचे काम हिसकावून घेत आहेत.

हे सर्व सुरू असताना राज्यकर्ते हतबलपणे बसले आहेत. त्यामुळे आम्ही महायुती सरकारचे काळे कारनामे घेऊन जनतेच्या दरबारात जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन यात्रेची सुरूवात करणार आहोत. पहिल्या टप्प्यात दहा दिवसांत ही यात्रा महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांतून जाणार असून लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com