Jayant Patil : "27 जणांचा मृत्यू झालाय तिथेच सरकार सेलिब्रेशन...", जळगावातील 'लखपती दीदी' कार्यक्रमावर जयंत पाटलांची टीका

Jayant Patil On Mahayuti Goernment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावात 'लखपती दीदी' हा मेळावा होत आहे. महायुतीकडून या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 25 August : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावात 'लखपती दीदी' हा मेळावा होत आहे. महायुतीकडून या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर याच मेळाव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

"नेपाळ येथील बस अपघातामध्ये जळगावमधील (Jalgaon) 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सन्नाटा पसरला आहे. अनेक तालुक्यांमध्ये या मृतांची गावं आहेत आणि सरकार तिथे सेलिब्रेशन करायला गेलं आहे. सरकारला चाड असेल तर हा कार्यक्रम रद्द केला पाहिजे किंवा नरेंद्र मोदी यांना या घटनेबद्दल सांगावं ते स्वत: हा कार्यक्रम टाळतील," असं जयंत पाटील म्हणाले.

सरकार गुलाबी झालं

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) गुलाबी कॅम्पेनवर देखील भाष्य केलं. "महाराष्ट्र गुलाबी झाला नाही, तर सरकार गुलाबी झालं आहे," अशी खोचकटोला त्यांनी यावेळी लगावला. तर शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत असून अनेकांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, "अजून आम्ही इंदापूरपर्यंत पोहचलो नाही" असं म्हणत त्यांनी या विषयावर जास्त बोलणं टाळलं.

Jayant Patil
Ajit Pawar : जळगावातील भरसभेत अजितदादांनी सांगितलं PM मोदींचं 'स्वप्न'

पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं नाही

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. 'राज ठाकरेंच्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केले नाही. वेगळ्या पक्ष्यातील लोक जातीपातीचे राजकारण करतात', असं ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com