Ajit Pawar : जळगावातील भरसभेत अजितदादांनी सांगितलं PM मोदींचं 'स्वप्न'

Ajit Pawar In Jalgaon Sabha : महिलांवर कुठलीही जबाबदारी टाकली, तर कोणत्याही परिस्थितीत ते आव्हान यशस्वीपणे पेलू शकतात, असं अजितदादांनी म्हटलं.
ajit pawar narendra modi
ajit pawar narendra modisarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावात 'लखपती दीदी' हा मेळावा होत आहे. या मेळाव्याला कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मंत्री आणि नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचं स्वप्न सांगितलं आहे.

जळगावात पाऊस पडला होता, तरी मोठ्या संख्येने महिला पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी उपस्थिती राहिल्या, असं म्हणत अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांनी कौतुक केलं आहे. तसेच, तीन कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचं स्वप्न पंतप्रधानांनी पाहिलं आहे, असं अजितदादा पवार सांगितलं.

ajit pawar narendra modi
Jayant Patil : पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचा बडा नेता 'तुतारी' हाती घेणार? जयंत पाटलांशी बंद दाराआड चर्चा

अजितदादा पवार म्हणाले, "माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांनी देशाच्या पंतप्रधानांचं ( Narendra Modi ) स्वागत केलेलं पाहत आहे. जळगावात पाऊस पडला होता, तरीही मोठ्या संख्येने महिला पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आल्या."

ajit pawar narendra modi
Mahayuti On Sugar Factory : सत्ताधाऱ्यांनी गावजेवण दिले, मात्र शेतकर्‍यांनाच उपाशी ठेवले

"3 कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचं स्वप्न पंतप्रधानांनी पाहिलं आहे. महाराष्ट्रातील 50 लाख महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचं संकल्प करूया. यात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, याची खात्री आहे," असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केला.

"महिलांवर कुठलीही जबाबदारी टाकली, तर कोणत्याही परिस्थितीत ते आव्हान यशस्वीपणे पेलू शकतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे," असंही अजितदादांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com