Jaykumar gore : भाजपचे आमदार आमदार जयकुमार गोरे यांचा आज पहाटे अपघात झाला. यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल येथे उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे. (jaykumar gore accident news update)
अपघातानंतर जखमी अवस्थेतच आमदार जयकुमार गोरे त्यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर तसेच स्वीय सहायक अभिजित काळे यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. त्यांनी पोलिसांशी संपर्क करून जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना केले. आमदार गोरे यांच्या हाताला आणि बरगडीला दुखापत झाल्याने त्यांच्यावर रुबी हॉलमध्ये उपचार सुरु आहेत.
आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटण जवळ आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. स्मशानभूमी जवळील बाणगंगा नदीवरील पूलावरून त्यांची गाडी 50 फूट खाली कोसळली आहे.
सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून काल (शुक्रवारी) अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर आमदार गोरे विमानाने नागपूरहून पुण्याला आले. रात्री त्यांच्या गाडीने फलटण मार्गे दहिवाडीकडे निघाले होते. पहाटेच्या 3.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा गाडीला अपघात झाला. फलटण शहरात आत प्रवेश करताना बाणगंगा नदीवर पूल आहे, हा पूल थोडा अरुंद आहे, या पुलाचा अंदाज न आल्याने भरधाव गाडी यापुलावरून 50 फूट खाली कोसळली.
अपघातात आमदार गोरे जखमी झाले आहेत. जखमी अवस्थेत त्यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह स्वीय सहायक अभिजित काळे यांच्याशी संपर्क करून मदत मागितली. पोलिसांशी संपर्क करून जखमींना उपचारासाठी रवाना केले. त्यानंतर त्यांना ही दुखापत जास्त असल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांचा सोबत स्वीय सहायक रुपेश साळुंखे, कार्यकर्ता कैलास दड्स आणि अंगरक्षक बनसोडे हे होते.
स्वीय सहायक रुपेश साळुंखे, कार्यकर्ता कैलास दड्स त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बारामतीच्या भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. अंगरक्षक बनसोडे ही जखमी असून त्याच्यावर फलटण मध्ये उपचार सुरु आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.