
Martand Devsansthan Trustee : जेजुरी खंडोबा मंदिराच्या सात जणांच्या विश्वस्त मंडळात जेजुरीबाहेरील तब्बल पाच जणांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीसाठी सहधर्मदाय आयुक्तांनी कोणते निकष लावले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निवडीविरोधात ग्रामस्थांनी आपला रोष विविध मार्गांनी व्यक्त केला आहे.
सध्या जेजुरीत ग्रामस्थांचे चक्री उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सोमवारी (ता. ५ जून) अकरावा दिवस आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ग्रामस्थांची एका बैठकीचे आयोजन केले आहे. त्यात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Jejuri Agitation Against Trustee)
जेजुरीबाहेरी जास्त विश्वस्तांची निवड केल्याने जेजुरीकर आक्रम झाले आहेत. या निवडविरोधात ग्रामस्थांनी यापूर्वी पुणे-पंढरपूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. सहधर्मदाय आयुक्तांना निवदेन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवदेन दिले. या आंदोलकांची विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री विजय शिवतारे, आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी भेट घेतली. जेजुरीकर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने रविवारी (ता. ४ जून) मुंबईत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे.
या विश्वस्तमंडळावर जास्तीत जास्त जेजुरीकरांची निवड होणे गरजेचे असल्याचा दावा ग्रामस्थ करीत आहेत. आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जेजुरीत चक्री उपोषणाचा मार्ग आंदोलकांनी आवलंबला आहे. दरम्यान, जेजुरीत मुक्कामी असलेल्या संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) महारांजांच्या पालखीची सेवा करणार नसल्याचाही इशारा जेजुरीकरांनी दिला आहे. आता गावबंद करण्याच्या विचारात ग्रामस्थ असल्याची माहिती मिळत आहे. त्याबाबतच सोमवारी (ता. ५) सांयकाळी बैठकीचे ओयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला ग्रामस्थांसह पुजारी, व्यापारी, दुकानचालक, सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थित जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जेजुरी गाव बंद ठेवण्याचा निर्णयावर चर्चा होणार आहे. या बैठकीत होणारा निर्णयाची अंमलबजावणी लवकर करण्याचा विचारातही ग्रामस्थ असल्याची माहिती आहे. दरम्यान, आंदोलन सुरू असले तरी जेजुरीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबतही ग्रामस्थ जागरुक आहेत. त्यासाठी काही उपाययोजना करता येतील का, यावरही आता होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतले जातील. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.