Jejuri Trustee Dispute : जेजुरी मंदिर ट्रस्ट; नव्याने नेमलेल्या तीन विश्वस्तांवर गुन्हे दाखल असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

Jejuri News : विश्वस्त मंडळ नेमणुकीविरोधात ग्रामस्थांकडून न्यायालयीन लढ्याची तयारी
Jejuri Temple
Jejuri TempleSarkarnama
Published on
Updated on

Martand Devsansthan Trustee : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांची गेल्या आठवड्यात निवड करण्यात आली आहे. ही निवड पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी केली आहे. त्यांनी सातपैकी जेजुरीबाहेरील पाच विश्वस्तांची निवड केली.

जेजुरीबाहेरील निवडलेल्या या विश्वस्तांच्या निवडीचा जेजुरी खांदेकरी -मानकरी ग्रामस्थ मंडळाच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निषेध केला आहे. आंदोलन करून आपला रोषही व्यक्त केला. आता ग्रामस्थांकडून या विश्वस्त मंडळावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.

Jejuri Temple
Jejuri Trustee Dispute : जेजुरी विश्वस्तांचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता; ग्रामस्थ मार्गदर्शक मंडळाची स्थापना करणार

जेजुरीबाहेरील निवडलेल्या विश्वस्तांवरून ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला. पुणे-पंढरपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (Agitation) केले. त्यानंतर ग्रामस्थांनी निवडलेल्या विश्वस्तमंडळास सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी चक्री उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा बुधवारी (ता. ३१ मे) सहावा दिवस आहे. त्यास ग्रामस्थ, विविध संघटना, गणेश मंडळे आणि सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. आता हे चक्री उपोषणासाठी पुढील महिनाभराच्या तारख्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. (Jejuri Trustee Dispute)

आता ग्रामस्थांकडून मार्तंड देवसंस्थानच्या निवडलेल्या तीन विश्वस्तांवर गुन्हे दाखल असल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत सहधर्मदाय आयुक्तांना माहिती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी सांगितलेल्या माहितीनुसार, सहधर्मदाय आयुक्तांनी निवडलेल्या तीन विश्वस्तांवर गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत प्रशासनास माहिती दिली आहे. मात्र संबंधित विश्वस्तांनी खोटी कागदपत्रे सादर केलेली आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्रांवर गुन्ह्यांचा उल्लेख केला नाही. त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांचे पुरावे आहेत. ते सर्व पुरावे लवकरच सहधर्मदाय आयुक्तांना देणार असल्याचेही ग्रामस्थांनी यावेळी सांगतिले.

Jejuri Temple
Jejuri Trustees Dispute : जेजुरी विश्वस्तांचा वाद टिपेला; चक्री उपोषणाची महिनाभराची तयारी !

दरम्यान, ग्रामस्थांनी या निवडलेल्या विश्वस्तांविरोधात सहधर्मदाय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी जास्तीत जास्त स्थानिक ग्रामस्थांची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्याची मागणी केली आहे. मागणी लवकरात लवकर मान्य झाली नाही तर ग्रामस्थ विश्वस्तांना असहकार करणार आहेत. तसेच चक्री उपोषण सुरू ठेवण्याचाही इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. आता ग्रामस्थांच्या वतीन या निवडीविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची एक समिती गठीत करण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com