Pune : पुरोगामी समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात निवडणूक प्रचारात जादुटोणा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नरमध्ये नारायणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भानामतीचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. निवडणूक प्रचार प्रमुखाच्या घरासमोर भानामती केल्याचे आढळले.
काळ्या बाहुलीचा फोटो, लिंबाला टाचण्या लावल्या असून लिंबू, हळदीकुंकू, टाचण्या टोचलेल्या बाहुल्या आदी वस्तू आढळल्या आहेत. उद्या (रविवारी) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भानामतीचा प्रकार आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री कोणीतरी निवडणूक प्रचार प्रमुखाच्या घरासमोर अंधारात हा प्रकार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुकामध्ये अंधश्रद्धेचे प्रकार झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचे फोटो लावून जादुटोणा करण्यात आला आहे. याप्रकरणी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जुन्नर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचासह सदस्य पदांसाठी तसेच एका ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासह १५ ग्रामपंचायतींच्या ३१ रिक्त पदांसाठी निवडणूक होत आहे.
दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यात हरिपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही असाच प्रकार झाला आहे. निवडणुकीत आपल्या पॅनेलला विजय मिळाला, यासाठी कोणीतरी काळ्या बाहुल्यांची पूजा मांडली होती. हा प्रकार मोहित पॅनेलच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी या काळ्या बाहुल्या जाळल्या. परिसरात झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. बाहुल्या जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, वडगांव आनंद, पिंपळवंडी, निमगिरी, खटकाळे, खामगांव,धालेवाडी तर्फे मिन्हेर, राळेगण,पाडळी, सुकाळवेढे, बुचकेवाडी, पारुंडे, कांदळी, नारायणगांव, शिरोली तर्फे आळे, गुंजाळवाडी (बेल्हे), बांगरवाडी, गुळंचवाडी, बेल्हे, रानमळावाडी, पिंपरीकावळ, उंब्रज नंबर १,पांगरी तर्फे मढ, तांबेवाडी या ग्रामपंचायतीत उद्या मतदान होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.