परबांचे रिसॅार्ट तोडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन दापोलीकडे रवाना

''हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा,''
Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)यांच्या दापोली येथील रिसॅार्टवर कारवाई करण्यासाठी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे आज सकाळीच प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे. परब यांच्या रिसॅार्टवर दापोली पोलिस कारवाई का करीत नाही, याबाबतची विचारणा सोमय्या करणार आहेत.

परब यांचा रिसॅार्ट बेकायदा असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. ''हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक आहे, मला अटक करुन दाखवा,'' असे आव्हान सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. ''उद्धव ठाकरेंचं चाललं असतं तर माझे हात पाय कधीच तोडले असते, मात्र मला सुरक्षा आहे म्हणून वाचलो,'' असे सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya
रावणाचा जीव बेबींत, यांचा जीव मुंबईत ; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

''सत्यासाठी हा आग्रह आहे, हे अनधिकृत बांधकामं तोडावं लागणार आहे. दोन रिसॅार्ट आहे, एकावरच कारवाई तर दुसऱ्यावर का नाही. ठाकरे पोलिसांना नाचवतात, पोलिस जनतेचे आहेत, सगळे माफिया आहे, वसुलीवाले आहेत,'' असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

Kirit Somaiya
बिबट सफारीवरुन जुन्नरमध्ये आजी-माजी आमदारांच्या डरकाळ्या

केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयने हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याने 31 जानेवारी 2022 रोजी सांगितले आहे. हा रिसॉर्ट 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारने 17 डिसेंबर 2021 रोजी या रिसॉर्टला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. 30 डिसेंबर 2020 रोजी रिसॉर्ट व ही जागा अनिल परब यांनी सदानंद कदम यांना 1.10 कोटी रुपयांत विकली, व करार शेतजमिन म्हणून केले. मार्च 2020 मध्ये रिसॉर्टसाठी महावितरणकडे व्यावसायिक वीज जोडणी करीता अर्ज केला आहे, असे सोमय्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com