Amol Kolhe News : खासदार अमोल कोल्हेंना पाडणार ? जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले...

Ajit Pawar Vs Amol Kolhe : आक्रोश मोर्चाला पाठिंबा, पण मोर्चाला राजकीय रंग लागला...
Amol Kolhe, Ajit Pawar, Atul Benke
Amol Kolhe, Ajit Pawar, Atul BenkeSarkarnama
Published on
Updated on

Junnar News : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांना येणाऱ्या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असे थेट आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे शिरुर मतदारसंघात अजित पवार विरुद्ध खासदार कोल्हे असे चित्र पाहायला मिळणार आहे. याच मतदारसंघात जुन्नर विधानसभा आहे. या जुन्नरचे आमदार अतुल बेनके आहेत. त्यामुळे बेनके अजितदादांना मदत करणार की मित्र असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार? याची उत्सुकता सर्वांनाच आहे. याबाबत आमदार बेनके यांनी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार अमोल कोल्हे, (MP Amol Kolhe) बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जात आहे. शिरुर, बारामती लोकसभा मतदारसंघातून निघालेल्या या मोर्चाची सांगता शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर होणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जाहीर सभा घेणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काढण्यात आलेल्या मोर्चाबाबत जुन्नरचे आमदार बेनके म्हणाले, खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेला मोर्चा चांगला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आहे. मात्र, त्यात शेतकरी कुठे आहे, शेतकरी सध्या त्याच्या कामात अडकला असल्याने मोर्चाला गर्दी कमी असावी. माझा या मोर्चाला पाठिंबाच आहे. मात्र, या मोर्चाला राजकीय रंग दिल्याने यामध्ये सहभागी झालो नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe, Ajit Pawar, Atul Benke
Maharashtra Government : थर्टी फर्स्ट, न्यू इयर अन् रात्रभर दारू… शिंदेंना ठाकरेंच्या सैनिकांचे सवालच-सवाल

अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे आव्हान दिले आहे. या राजकीय लढतीत तुम्ही कोणाची साथ देणार ? असा प्रश्न आमदार बेनके यांना विचारला असता ते म्हणाले, सध्या मी कोणत्याही गटाला पाठिंबा दिलेला नाही. तालुक्याच्या विकासासाठी अधिकाधिक निधी कसा आणता येईल, यासाठी माझा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दोन गटांत विभागली आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून जी भूमिका घेतली आहे. तीच भूमिका आजही माझी कायम आहे. तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे हीच माझी भूमिका आहे.

निवडणुकीला अजून कालावधी आहे. त्यावेळची परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल. राजकारणात मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे ठेवावे लागते. पक्षाची भूमिका जी असते त्याला पाठिंबा देत वेळ पडल्यास मित्रांच्या विरोधात देखील लढावे लागते. ही वस्तूस्थिती आहे. मात्र यामुळे मैत्रीत काही फरक पडत नाही. पुढील काही दिवसांत पवार कुटुंबातील सर्व एकत्र येतील. दादा, साहेब असे कोणतेही दोन गट राहणार नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस एकच राहील, असे भाकीत आमदार बेनके यांनी वर्तवले.

राजकारणाचा दर्जा घसरत चालला असून खासगी गोष्टी जाहीर करू नये, या मताचे आपण आहोत. पक्षात फूट पडताना अजित पवारांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. त्या अद्यापही बाहेर आलेल्या नसल्याचे सूचक वक्तव्य आमदार बेनके यांनी केले.

Amol Kolhe, Ajit Pawar, Atul Benke
Shivsena Politcal News : व्हॅनिटी दानवेंची, नारळ फोडला खैरेंनी, गुदगुल्या शिरसाटांना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com