काकडे गटाची मुलुखमैदानी तोफ प्रा. बाळासाहेब जगतापांचा राष्ट्रवादीत प्रवेश

त्यांच्या पक्षातरांमुळे कृती समितीला पर्यायाने काकडे गटाला धक्का मानला जात आहे.
AjitPawar-Balasaheb Jagtap-Pushpalta Jagtap
AjitPawar-Balasaheb Jagtap-Pushpalta JagtapSarkarnama
Published on
Updated on

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : शेतकरी कृती समितीचे संस्थापक नेते आणि काकडे गटाची मुलुखमैदानी तोफ प्रा. बाळासाहेब जगताप आणि त्यांच्या पत्नी, चोपडजच्या सरपंच पुष्पलता जगताप यांनी आज निवडक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या पक्षातरांमुळे कृती समितीला पर्यायाने काकडे गटाला धक्का मानला जात आहे. (Kakade group's Balasaheb Jagtap joins NCP)

बारामती तालुक्यातील चोपडज (ता. बारामती) परिसरात प्रा. बाळासाहेब जगताप यांचे बऱ्यापैकी प्रस्थ आहे. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याने कृती समिती आणखीनच कुमकुवत झाली आहे. प्रा. जगताप हे कृती समितीचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते असून 2007 च्या सोमेश्वर कारखाना निवडणुकीत ते अल्प मतांनी पराभूत झाले होते. कृती समितीची मुलुखमैदानी तोफ म्हणूना प्रा. जगताप परिसरात परिचित होते. मागील वर्षी सर्वपक्षीय आघाडी करून करून त्यांनी चोपडज ग्रामपंचायतीत सत्ता प्राप्त केली आहे. सरपंचपदी त्यांच्या पत्नी पुष्पलता जगताप झाल्या आहेत.

AjitPawar-Balasaheb Jagtap-Pushpalta Jagtap
अजित पवारांची डोकेदुखी वाढली; भाजपचे राष्ट्रवादीच्या नाराजांवर लक्ष

मागील काही काळापासून विकास कामांच्या अनुषंगाने त्यांची संभाजी होळकर, संग्राम सोरटे, बापू धापटे या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळीशी जवळीक वाढली होती. यातूनच अखेर जगताप दांपत्याने आज शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष देविदास जगताप, भाजपचे कार्यकर्ते मारुती कोळेकर या प्रातिनिधिक कार्यकर्त्यांना घेऊन राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती बापू धापटे, सुनील खलाटे, उपसरपंच तुकाराम भंडलकर, बबन निकम, रामचंद्र भंडलकर आदी उपस्थित होते.

AjitPawar-Balasaheb Jagtap-Pushpalta Jagtap
संतापजनक : वाळूमाफियाने वाहन अंगावर घालून पोलिस कर्मचाऱ्यास चिरडले

सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत जगताप दाम्पत्याने दोघांचेही अर्ज भरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत चोपडजच्या सरपंच पुष्पलता जगताप म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडजला जिल्ह्यातील विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी पक्षप्रवेश केला आहे. पवार यांनीही लवकरच गावात येण्याचा शब्द दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com