Rohit Pawar: काय सांगता? रोहित पवारांच्या उमेदवारीचा पत्ता कट करण्यासाठी काँग्रेस अन् ठाकरे गटाच्या बंद दाराआड जोरबैठका

Thackeray Group and Congress Opposing MLA Rohit Pawar:2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर किरण पाटील हे या मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, यासाठी काँग्रेस आणि त्याचसोबत ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. ज्या पक्षाचा विद्यमानआमदार, त्याला ती जागा मिळणार, हे सूत्र महाविकास आघाडीत ठरलं असताना काही जागांवर आघाडीतील मित्र पक्षांनीच दावा केल्याने पेच निर्माण होण्याचे चित्र आहे.

कर्जत-जामखेड विधानसभेचे विद्यमान आमदार रोहित पवार यांची आगामी विधाससभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पण आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे रोहित यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध करण्यात येत आहे. रोहित पवार यांना महाविकास आघाडीमध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळू नये म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या जोरबैठका सुरु आहेत.

Rohit Pawar
Nandurbar News: विरोधक-सत्ताधारी भिडले; झेडपीच्या सभेत माईक खेचला!

मागील चार वर्षात त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म मतदारसंघात पाळला नाही, असा स्थानिक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप करण्यात येत आहे. 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर किरण पाटील हे या मतदारसंघातून आमदार होते.त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा, यासाठी काँग्रेस पक्ष आणि त्याचसोबत ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले आहे.

Rohit Pawar
Fadnavis Vs Deshmukh: Video फडणवीसांनी देशमुखांचा विषय एका वाक्यातच संपवला; म्हणाले, ‘झूट बोले कौवा काटे'...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडानंतर आमदार रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ते सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या प्रश्नावर आणि निर्णयावर उघडपणे प्रतिक्रिया देत अंगावर घेत आहेत. कर्जत-जामखेडवर आपलीच पकड आहे, हे सिद्ध करताना पवार पूर्ण ताकदीने लोकसभेच्या प्रचारात उतरले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com