सागर निकवाडे
नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेत आज गोंधळ झाला. सत्ताधारी-विरोधक एकमेकांमध्ये भिडले. त्यामुळे सभागृहाचे वातावरण तणावपूर्ण झाले होते. सत्ताधारी काही सदस्यांनी विरोधी सदस्यांकडील माईक खेचण्याचा प्रयत्न केला.
वादावादीनंतर विरोधकांनी सभा त्याग केला. सत्ताधारी- विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. आगामी काळात नंदुरबारमधील राजकारण तापणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवरून दिसते.
जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु झाली. यावेळी सभेचे अजेंडा आणि प्रोसिडिंग मिळत नाही, सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार चालवला जातो, असा आरोप विरोधकांनी केला. विरोधकांनी सभागृहातून सभा त्याग केला तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी महत्वाच्या विषयावर विरोधकांना गांभीर्य नसल्याचा आरोप केला. विरोधकांची भूमिका चुकीचे असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.
सभेत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार करण्यास सुरुवात केली. यातूनच सभागृहात सताधाऱ्यांच्या विरोधात वातावरण निर्माण झाले. सत्ताधारी काही सदस्यांनी विरोधी सदस्यांकडे माईक हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या वादावादीनंतर विरोधकांनी सभागृहातून सभा त्याग केला आहे. सत्ताधाऱ्यांनी बोलावलेली सभा नियमबाह्य असून या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील खराब रस्ते आरोग्यसेवा आणि यासारख्या महत्त्वाच्या विषयावर सभेमध्ये चर्चा करायची होती, मात्र विरोधकांना या विषयाचे गांभीर्य नसल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालण्यात सुरुवात केल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.