Kasba By- Election : चंद्रकांत पाटील म्हणाले, हू इज धंगेकर? आघाडीने दिले 'असे' उत्तर

कसबा पोटनिवडणूक भाजपकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती.
Kasba By- Election :
Kasba By- Election : Sarkarnama

Kasba By- Election : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी झाले. धंगेकरांच्या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी पुण्यात ठिकठिकाणी 'धिस इज धंगेकर' अशा मजकूराचे पोस्टर लावून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना डिवचलं आहे.

कसबा पोटनिवडणूक भाजपकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह भाजपचे अनेक बडे नेते या भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळाले. कसबा मतदारसंघाचा कोपरान् कोपरा भाजप नेत्यांनी पिंजून काढला.

Kasba By- Election :
Abdul Sattar : संजय राऊतांनी उद्ध्वस्त केले शिवसेनेचे साम्राज्य...

दरम्यान रासने यांच्या प्रचारसभेत एकदा चंद्रकांत पाटील यांनी धंगेकरांना कमी लेखत थेट 'हू इज धंगेकर', असा खोचक सवाल विचारला होता. पण मतमोजणीच्या दिवशी धंगेकर पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. त्यानंतर समाजमाध्यमांवरही चंद्रकांत पाटील यांच्या हू इज धंगेकर' या प्रश्नाचे मीम्स व्हायरल होऊ लागले होते. अंतिम निकालात धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले. त्यांच्या या विजयानंतर महाविकास आघाडीकडून पुण्यात ठिकठिकाणी 'धिस इज धंगेकर' अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने लावलेल्या बॅनर्सवर लिहिलंय की, ‘Who is Dhangekar'.. लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीच्या लढाईत हुकूमशाहांच्या बालेकिल्ल्यात त्यांना चारी मुंड्या चीत करणारा शिवरायांचा मावळा... आमदार रविंद्रभाऊ धंगेकर. कसबा तो सिर्फ झांकी है, कोथरुड अभि बाकी है, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांना आव्हान दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com