Kasba News : पाठिंबा कुणाला मनसेचे ठरेना: धंगेकर म्हणतात, तिथे तर सारे माझे मित्रच!

Pune Politics : कसबा पोटनिवडणुकीबाबत मनसे शनिवारी अधिकृत भूमिका जाहीर करणार
Raj Thackeray and Ravindra Dhangekar 
Raj Thackeray and Ravindra Dhangekar  Sarkarnama

Kasba-Chinchwad By-Election : कसबा पोटनिवडणुकीरुन राजकारण तापले आहे. उमेदवारांनी या निवडणुकीसाठी आपला जोरदार प्रचारही सुरु केला आहे. मात्र, कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे मनसेचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

कसबा पोटनिवडणुकीबाबत मनसे शनिवारी अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे. शहर कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर मनसे पुढील आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे भाजपला पाठिंबा देणार का? की तठस्थ राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्या बाजूला रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी मनसे (MNS) महाविकास आघाडीलाच (Mahavikas Aghadi) पाठिंबा देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Raj Thackeray and Ravindra Dhangekar 
Dr. Vijaykumar Gavit; आदिवासी भागात लवकरच `पेसा` भरती होणार

रवींद्र धंगेकर या संदर्भात बोलताना म्हणाले, ''पुणे शहरात माझे अनेक मित्र आहेत आणि भाजपमध्ये पण माझे मित्र आहेत. त्यामुळे सर्वच जण मला मदत करतील'', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांना मनसे पाठिंबा देईल का? असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर धंगेकर म्हणाले, ''हा प्रश्न आहे का? सहकारी आहेत ते माझे, मदत तर करणारच'', असं उत्तर त्यांनी दिलं.

Raj Thackeray and Ravindra Dhangekar 
Patan : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी शंभूराज देसाईंनी दिली ही अनोखी भेट...

दरम्यान, रवींद्र धंगेकर हे दोनदा नगरसेवक होते. त्यांनी काही वर्ष मनसेत काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा मनसेत देखील चांगला संपर्क आहे. मात्र, आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray and Ravindra Dhangekar 
Eknath Shinde birthday News; लवकरच रिक्षाचालकांसाठी अच्छे दिन!

तसेच चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी 20, तर भाजप 40 प्रचारकांची फौज उतरवणार आहे. भाजपकडून गडकरी, नारायण राणे (Narayan Rane), रावसाहेब दानवे, भागवत कराड हे केंद्रीय मंत्री प्रचारात उतरणार आहेत.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह वीस जणांची फौज तयार आहे. त्यामुळे आता आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com