Dr. Vijaykumar Gavit; आदिवासी भागात लवकरच `पेसा` भरती होणार

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्यावर मंत्र्यांची सहमती
Vijaykumar Gavit & Narhari Zirwal
Vijaykumar Gavit & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आदिवासी (Trible) विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) यांनी अर्थसंकल्पासंदर्भात (Budget) बोलावलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जास्त निधी द्यावा अशी मागणी केली. आदिवासी भागात लवकरच `पेसा` कायद्यानुसार भरती होणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPM) नेते, आमदार कॉम्रेड विनोद निकोले (Vinod Nikole) यांनी दिली. (Trible students Hostel admission process will more simple know)

Vijaykumar Gavit & Narhari Zirwal
Dada Bhuse; मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी २७५ उमेदवारांना सरकारी नोकरी!

यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, पेसा कायदा 1996 चे मुख्य सूत्र आहे "अनुसूचित क्षेत्राच्या संस्कृती, प्रथा- परंपरा यांचे जतन, संवर्धन व ग्रामसभेच्या माध्यमातून स्वशासन व्यवस्था मजबूत करणे”. पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रामधील ग्रामसभांचे विशेष अधिकार मान्य करण्यात आले.

Vijaykumar Gavit & Narhari Zirwal
NCP News: भुजबळांना 26 महिने तर विरोध करणाऱ्याला 30 महिने शिक्षा!

अनुसूचित क्षेत्रातील नोकरी भरती संदर्भातील अधिसूचना तसेच विविध शासन निर्णय आहेत.भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 244 (1) मध्ये पाचव्या अनुसूचित क्षेत्राबद्दल तरतुदी केल्या आहेत. घटनेच्या पाचव्या अनुसूचित राज्यपालांना आदिवासी क्षेत्रांकरीता विशेष उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांनी त्यांना भारतीय राज्य घटनेच्या पाचव्या सूची तील परिच्छेद 5 मधील उप परिच्छेद 1 नुसार प्रदान केलेल्या अधिकारानुसारअनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती करिता स्थानिक नोकरी भरतीमध्ये विशेष तरतुदी निर्देशित केल्या. त्यानुसार आमच्या उच्च शिक्षित तरुणांना पेसा कायदा अंतर्गत नोकरी मिळाली पाहिजे असा आग्रह आदिवासी विकास मंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय बैठकीत करण्यात आला.

यावर मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले की, लवकर पेसा कायदा अंतर्गत भरती घेण्यात येईल. अशी माहिती आमदार निकोले यांनी दिली. आदिवासी भागातील विद्यार्थी - विद्यार्थीनी दर्जेदार, उत्तम शिक्षण, उच्च शिक्षक मिळावे म्हणून ते वसतिगृह हा पर्याय निवडतात. स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिफारस पत्र देऊन देखील योग्य विचार होत नाही.

यावर मंत्र्यांनी सांगितले की, नवीन अर्थसंकल्पात आपण वसतिगृहांची संख्या वाढत आहोत त्यामुळे वसतिगृहाचा मुद्दा देखील निकाली निघेल असं वाटते असे आमदार निकोले म्हणाले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आदिवासी विकास विभागाचे सचिव गोविंद बोडके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, आमदार राजेश पाटील, आमदार सुनील भुसारा, आमदार श्रीनिवास वनगा यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com