Kasba Election News : दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा व चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या जागांवर निवडणूक आयोगाने आज अचानकपणे पोटनिवडणूक जाहीर केली. मुक्ता टिळक यांच्या निधनाला तीन आठवडे तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनाला केवळ १५ दिवस झाले आहेत. इतक्या कमी काळात पोटनिवडणूक जाहीर होतील हा अंदाज कोणत्याच राजकीय पक्षाला नसताना अचानकपणे थेट निवडणुकीच्या तारखाच जाहीर झाल्याने राजकीय पक्षांमध्येदेखील गोंधळ उडाला.
पुण्यात कसबा विधानसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा इतके दिवस दबक्या आवाजात सुरू होती. माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्यापैकी एकाला मिळणार की गणेश बीडकर यांचाही विचार होणार होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या तिघांच्या नावाशिवाय दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या घरातील कुणाचा विचार होणार का याचीही चर्चा सुरू झाली आहे.
विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघाचे नेतृत्व सलग २५ वर्षे केले आहे. गेली २५ वर्षे ते कसब्यातून आमदार होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून खासदार म्हणून ते निवडून आले. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली होती. पुणे महाापलिकेत अनेक वर्षे नगरसेवक असलेल्या मुक्ता टिळक या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.