भुजबळांविरोधात याचिका करणारे आमदार कांदे पत्रकारांना पाहून पसार झाले!

आज सकाळी कोरोना आढावा बैठकीला ते पुन्हा एकत्र आले. जवळ जवळ बसले.
Chhagan Bhujbal- Suhas Kande
Chhagan Bhujbal- Suhas KandeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी गुरुवारी पालकमंत्री (Guardian Minister) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर आरोपाचा बाँब टाकला.

आज सकाळी कोरोना आढावा बैठकीला ते पुन्हा एकत्र आले. (Both come together) जवळ जवळ बसले. (Seaat together) मात्र बैठक संपताच पत्रकारांना (Journalist) टाळण्यासाठी आमदार कांदे मागच्या मागे पसार झाले. या विषयावर प्रत्यक्षच काय फोनवर देखील बोलण्यास तयार नसल्याने त्यांच्यावर कोणती मात्रा लागू पडली हा चर्चेचा विषय आहे.

Chhagan Bhujbal- Suhas Kande
छगन भुजबळ म्हणाले, `आमचं आम्ही पाहून घेऊ`

जिल्हा नियोजन समितीतील निधी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वळविल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी आज मात्र त्याविषयी चकार काढला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला कांदे आले असता, त्यांना पत्रकारांशी विचारले असता, सोयीस्कररित्या बगल देत त्यांनी याप्रश्नी मौन पाळले तर स्वता भुजबळ यांनी आम्ही महाविकास आघाडी घटक पक्षात किचकट विषय सोडविण्यासाठी उच्च स्तरीय समिती आहे. आम्ही आमचे पाहून घेऊ असे सांगत त्यांनीही या विषयाला बगल दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वाटपावरुन काही दिवसांपासून पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात शीतयुध्द सुरु आहे. या महिनाभरात नांदगावला दोनदा पूर आल्याने त्या भागातील व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाल्यानंतर निधी वाटपाचा विषय ऐरणीवर आला. दोन आठवड्यापासून सुरु असलेली धुम्मस आज दिसली. मात्र त्याविषयी भाष्य करणे दोघांनीही टाळले.

पूरात पॅचअप गेले वाहून

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे हे नांदगाव मतदार संघात लोकप्रतिनिधी आहे. तर भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे कांदे यांचे राजकिय विरोधी उमेदवार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर श्री भुजबळ पालकमंत्री झाले. तर कांदे यांना महाविकास आघाडीचे नेते असलेल्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागत आहे. मतदार संघात परस्परांचे विरोधक असलेल्या या दोन्ही नेत्यांना मतदार संघातील पूरानंतरच्या स्थितीत कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा आपत्कालीन निधी हा वादाचा मुद्दा ठरला आहे.

Chhagan Bhujbal- Suhas Kande
राज म्हणतात, `बाळासाहेबांनी मला जोडे दाखवले`

नांदगावला पूरग्रस्तांना आपत्कालीन निधीतून मदत द्यावी ही कांदे यांची मागणी आहे. तर असा निधी नाही. राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवू तेथून निधी आल्यावर पाहू असे पालकमंत्री भुजबळ यांचे म्हणणे आहे. या मुद्यावरुन महिण्यापासून त्यांच्यात वातावरण पेटले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दोन्ही नेत्यात पॅचअप करण्याचा प्रयत्नही केला. मात्र नांदगावला आलेल्या दुसऱ्या पूरात हे पॅचअप निघून गेले.

कांदे सायलेंट मोडवर

नांदगाव मतदार संघात पालकमंत्री भुजबळ यांच्या विरोधात जिल्हा नियोजन समितीचा निधी वळविल्याचा आरोप करणारे सुहास कांदे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला आल्यानंतर त्यांना विचारले असता, श्री कांदे यांनी सपशेल मौन धारण केले. पत्रकारांचे फोन देखील घेण्याचे त्यांनी टाळले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com