Kiren Rijiju Pune Press News : 'काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार अपमान केला, स्वतःच्या सोईनुसार संविधानात बदल केला. मुस्लिमांचा मतपेटी म्हणून वापर केला. राहुल गांधी हे हातामध्ये संविधानाचे खोटे पुस्तक घेऊन प्रचार करतात, ते कधीही प्रगल्भ नेते होऊ शकणार नाहीत.', अशी टीका केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रिजिजू बोलत होते. यावेळी अतुल साळवे, किरण कांबळे, निवेदिता एकबोटे आदी उपस्थित होते.
किरेन रिजिजू(Kiren Rijiju) म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दलितांची दिशाभूल करून मतदान घेतले. पण यापुढे असे होणार नाही. दलित समाजामध्ये जाऊन आम्ही चर्चा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न पुरस्कार भाजपने दिला, ‘संविधान दिवस’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केला. काँग्रेसने कायमच दलित समाज आणि आंबेडकरांचा अपमान केला आहे हे आम्ही महाराष्ट्रभर जाऊन सांगितले आहे.'
तसेच 'गेल्या काही महिन्यात मी स्वतः महाराष्ट्रात 250 बैठका घेतल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी नागपूरमध्ये संविधानासारखे दिसणारे बनावट पुस्तक हातात धरून संविधान नारा दिला. पण आम्ही त्यांचा बनाव उघड केला. त्यामुळे यावेळी दलित समाजाची दिशाभूल होणार नाही. काँग्रेससाठी एक परिवार महत्त्वाचा आहे पण आमच्यासाठी देश प्रथम आहे.' असं रिजिजू यांनी सांगितलं.
याचबरोबर रिजिजू म्हणाले, 'देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्राची निवडणूक महत्त्वाची आहे. मोदी सरकार देशात आल्यानंतर अनेक पूल, उड्डाणपूल, बोगदे, रस्ते बनले. त्यामुळे मुंबईचा चेहरामोहरा बदलला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे गरीब महिलांना आर्थिक आधार मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता महायुती सरकारवर खूश असल्याने काँग्रेस(Congress) अस्वस्थ आहे.'
जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्याने मागासवर्गीय नागरिकांना आरक्षण लाभ मिळत आहे. पण हे आरक्षण काँग्रेस काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देशाची सीमा पूर्णपणे सुरक्षित असून, भारताच्या सीमेवर कोणाचेही अतिक्रमण नाही. दिवाळीमध्ये भारतीय लष्कराने चीन लष्करास मिठाई ऊद दिली. मोदींच्या यांच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही, अरे रिजिजू यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.