Mallikarjun Kharge on Mharashtra Vidhansabha Election : 'महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे' असा प्रचार भाजपतर्फे केला जात आहे. त्यात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘एक है तो सेफ है‘ अशी सुधारणा केली आहे. त्यामुळे भाजपात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांचेच यावर एकमत दिसत नाही.', असे सांगून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपवर निशाना साधला. मारणारे आणि वाटणारे तुम्हीच आहात आम्ही आधीपासून एकच आहोत, असाली टोला त्यांनी लागावला.
विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मल्लिकार्जुन खर्गे(Mallikarjun Kharge) नागपूरला आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी खर्गे म्हणाले, 'महत्त्वाचे आणि लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न भाजप उपस्थित करीत नाही. महाराष्ट्रातील समस्यांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये याकरिता भलतेच विषय चर्चेला घेतात. राहुल गांधी यांच्या हाती असलेल्या लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतिचा बाऊ केला जात आहे. ही छोटीशी घटना आहे. मात्र त्याचे राजकारण केले जात आहे. राहुल गांधी यांना शहरी नक्षल समर्थक ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपने राष्ट्रपतींना दिलेल्या संविधानाच्या प्रतीचे कव्हरसुद्धा लालच रंगाचे होते.'
याचबरोबर 'भाजपला(BJP) भडकाऊ भाषणे देण्याची सवयच आहे. विकास कामांवर ते कधीच मत मागत नाही. बटेंग तो कटेंग हा त्यांच्याच धोरणाचा भाग आहे. मुळात भाजपचे सत्ता हेच ध्येय आणि धोरण आहे. सत्तेसाठी त्यांनी महाराष्ट्रातील दोन पक्ष फोडले. आता मतांचे विभाजन करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे अशी भीती दाखवली जात आहे. लोकांची दिशाभूल केली जात आहे.' असा आरोपही खर्गे यांनी केला.
याशिवाय 'राहूल गांधी(Rahul Gandhi) हे संविधानात बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांसाठी जे काही लिहले, तरतुदी केल्या आहेत त्याची माहिती देत आहेत. सर्वांना न्याय आणि समान वागणुकीचा पुरस्कार करीत आहेत. तेसुद्धा भाजपला खटकत आहे. काँग्रेसचा जाहीरनामा आणि योजनांना ते रेवडी संबोधतात. त्यांचा जाहीरनाम्यातून भरमसाठ मोफत योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. मग त्याला काय म्हणायचे?' असा सवालही खर्गे यांनी केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.