किरीट सोमय्या हल्ला प्रकरण : शिवसेना शहरप्रमुखासह १० जणांना अटक व सुटका

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते.
Kirit Somaiya Attack Case
Kirit Somaiya Attack CaseSarkarnama

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Soamiya) यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ला प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आज १० जणांना अटक केली.पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात आरोपींना न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. (Kirit Somaiya Attack Case)

Kirit Somaiya Attack Case
सोमय्यांवरील हल्ल्याचे राजकारण; महापौरांच्या पत्राला आयुक्त काय उत्तर देणार ?

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय हरिश्चंद्र मोरे, युवासेनेचे सहसचिव किरण प्रकाश साळी, सूरज नथुराम लोखंडे, आकाश चंद्रकांत शिंदे, रूपेश आनंदराव पवार, राजेंद्र दामोदर शिंदे, नीलेश दशरथ गिरमे, मुकुंद पांडुरंग चव्हाण, अक्षय शरद फुलसुंदर आणि नीलेश हनुमंत जगताप असे जामीन मिळालेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यासह एकूण ६० ते ७० महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लाटे (वय ३०, रा. वडारवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शनिवारी (ता. ५) रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात सोमवारी सनी वसंत गवते याला अटक करण्यात आली होती.

Kirit Somaiya Attack Case
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील आरोपी पुणे पोलिसांसमोर हजर

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मुख्य पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलर पकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला.

न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी ॲड. सतीश मुळीक आणि ॲड. सचिन हिंगणेकर यांनी अर्ज केला. या अर्जास सरकारी वकिलाने विरोध करीत गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असून त्यांना अटक करायची आहे. तसेच मुख्य सुत्रधाराबाबत तपास बाकी आहे. हा गुन्हा राजकीय स्वरूपाचा असून त्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना जामीन मंजूर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com