Kirit Somaiya target Supriya Sule : ''EDची नोटीस आली तेव्हा वाल्मिक कराड सुप्रिया सुळे यांच्यासोबत...'' ; किरीट सोमय्यांचं विधान!

Kirit Somaiya, Supriya Sule and Walmik Karad : जाणून घ्या, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना नेमकं काय विधान केलं आहे?
Kirit Somaiya, Supriya Sule and Walmik Karad
Kirit Somaiya, Supriya Sule and Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Kirit Somaiya on Walmik Karad : बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या हत्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना कालपर्यंत वाल्मिक कराड तुमच्याच पक्षात तुमच्यासोबत होता अशी टीका केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी गुरुवारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बांगलादेशी नागरिकांच्या अवैध घुसखोरी संदर्भात निवेदन दिले. यानंतर माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, बांगलादेशी नागरिक आपल्या देशामध्ये अवैधरित्या घुसखोरी करून चुकीच्या पद्धतीने खोटे दाखले मिळवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या विरोधात देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वातील सरकारने मोहीम उघडली आहे. अवैधरित्या आलेल्या बांगलादेशी नागरिकांना आत्तापर्यंत 2024 मध्ये पुण्यामधून 60 जन्माचे दाखले देण्यात आल्याची शक्यता आहे. हेच प्रमाण मालेगाव मध्ये 4300,अमरावती 4537 आणि मुंबई मध्ये 58 इतके आहे. या सर्व दाखल्यांचा रिव्ह्यू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Kirit Somaiya, Supriya Sule and Walmik Karad
Supriya Sule : धनंजय मुंडे परळीत अन्‌ सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

2023 नोव्हेंबर मध्ये जन्म दाखला देण्याचा अधिकार आता तहसीलदार यांना देण्यात आला म्हणून हा गोंधळ झाला आहे. मात्र या सर्व बांगलादेशी नागरिकांना ओळखून त्यांना परत पाठवण्याचं काम करण्यात येणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya, Supriya Sule and Walmik Karad
Devendra Fadnavis: गृहमंत्रीसाहेब, बीड ते बांद्रा...राज्यात चाललंय काय !

वाल्मीक कराड याने दहशतीच्या जोरावर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली असून त्याच्यावर ईडीची कारवाई होणार का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी उपस्थित केला होता. याबाबत बोलताना किरीट सोमय म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कोणालाही सोडण्यात येणार नाही. वाल्मिक कराड हा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. राष्ट्रवादी काँग्रेस आता वेगळी झाली असून जेव्हा वाल्मीक कराडला 2022 मध्ये ईडीची नोटीस आली तेव्हा तो सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकाच पक्षात होता, तेव्हा तुमचं सरकार होतं ना? असा सवाल किरीट सोमय्या सुप्रिया सुळे यांना केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com