सोमय्या, बापट २ तास पोलिस ठाण्यात बसले... पण गुन्हा दाखल नाही झाला

Kirit somayya in pune : न्यायालय आणि केंद्र सरकारकडे दाद मागण्याचा सोमय्यांचा इशारा
Kirit Somaiya
Kirit Somaiyasarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) काल (शुक्रवारी) शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर झालेल्या हल्ल्या विरोधात गुन्हा दाखल करायला गेले होते. मात्र, पोलिस स्टेशनमध्ये २ तास बसून राहिल्यानंतर देखील गुन्हा दाखल करण्यात आला नाही. सोमय्या यांच्यासमवेत विद्यमान खासदार गिरीश बापट (Girish Bapat) आणि पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदिश मुळीक (Jagdish Mulik) हे ही उपस्थित होते.

पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार दिल्यानंतर किरीट सोमय्या हे उपायुक्तांना भेटण्यासाठी शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) महापालिका कार्यालयात गेले होते. त्यावेळी पालिका कार्यालयाच्या पायऱ्यांवर सोमय्या आणि शिवसैनिक आमने सामने आले हेाते, या दरम्यान झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सोमय्या हे पायऱ्यांवर पडले होते. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. यानंतर या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ९ जणांना अटक केली आहे. तर २ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. (Kirit somayya in pune)

Kirit Somaiya
सोमय्या हल्लाप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित

दरम्यान, संबंधित प्रकरणात आपल्या तक्रारीनुसार हल्लेखोरांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सोमय्या शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले होते. मात्र २ तास बसल्यानंतरही त्यांचा गुन्हा नोंदवून घेण्यात आला नाही. त्याऐवजी पोलिसांनी पोलिसांनी पहिल्याच दाखल केलेल्या गुन्ह्यात सोमय्या यांचा जबाब नोंदविला. या प्रकारावर शिवाजीनगर पोलीस हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

Kirit Somaiya
संभाजीराजे यांच्या मनात काय चाललंय? भाजपची साथ सोडायच ठरतंय...

किरीट सोमय्या म्हणाले, पोलिसांनी माझी तक्रार तर घेतली नाहीच पण, सुरक्षारक्षकांवर हल्ला होऊन आणि तक्रार देवून त्यांचाही स्वतंत्र गुन्हा दाखल केला नाही. सर्व पुरावे देऊन ही पोलिस कारवाई करीत नाहीत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला. शिवाजीनगर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागेल. आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्ही न्यायालयाकडे जाणार किंवा केंद्राकडे जाणार असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com