सोमय्या हल्लाप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दोन कर्मचारी तडकाफडकी निलंबित

हे दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गोपनीय विभागाचे काम पाहत होते.
Kirit Somaiya Attack
Kirit Somaiya Attack Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : भाजपचे (bjp) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून दोन पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या दोन कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, पुणे भाजपच्या वतीने सोमय्या यांचा पालिकेत सत्कार समारंभ ठेवला आहे, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Two policemen suspended in Kirit Somaiya attack case)

पोलिस शिपाई दिलीप नारायण गोरे आणि सतीश ज्ञानदेव शिंदे अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. शिंदे आणि गोरे हे दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गोपनीय विभागाचे काम पाहत होते.

Kirit Somaiya Attack
राणाजगजितसिंह समर्थकाच्या माघारीने मधुकर चव्हाणांचे सुपुत्र जिल्हा बॅंकेत बिनविरोध!

पुण्यातील जंबो कोविड सेंटरमधील भ्रष्टाचाराची तक्रार दिल्यानंतर किरीट सोमय्या हे उपायुक्तांना भेटण्यासाठी शनिवारी (ता. ५ फेब्रुवारी) महापालिका कार्यालयात गेले होते. त्यावेळी पालिका कार्यालयाच्या पायऱ्यांवर सोमय्या आणि शिवसैनिक आमने सामने आले हेाते, त्यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमध्ये सोमय्या हे पायऱ्यावर पडले हेाते. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. दोन दिवसांच्या उपचारानंतर ते दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांना भेटून आले होते.

Kirit Somaiya Attack
राष्ट्रवादी नगरसेवकाच्या आरोपानंतर अस्वस्थ महेश कोठे थेट रुग्णालयात ॲडमिट!

दरम्यान, केंद्रीय गृहविभागाचे पोलिस अधिकारी पुण्यात दाखल झाले होते, त्यांनीही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन याबाबतची माहिती घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली. तसेच, सोमय्या यांचा समावेश असलेल्या भाजपच्या एका पथकाने दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांना भेटून याबाबतची इत्यंभूत माहिती दिली होती. खुद्द सोमय्या यांनी आयुक्त गुप्तांवर आरोप केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ही तडकाफडकी कारवाई करण्यात आली आहे.

Kirit Somaiya Attack
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी शिक्षकाला बनविले उपसभापती!

सोमय्यांना झालेल्या धक्काबुकी प्रकरणात कामात हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल पुणे पोलिसांनी शिवाजी पोलिस ठाण्याच्या गुप्तचर विभागातील पोलिस शिपाई दिलीप नारायण गोरे आणि सतीश ज्ञानदेव शिंदे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान, पुणे भाजपच्या वतीने ज्या ठिकाणी सोमय्या पडले, त्याच ठिकाणी त्यांचा आज दुपारी चार वाजता सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com