Koregaon Bhima Shaurya Din : "जनतेच्या मतावर निवडून आले..."; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री कोरेगाव-भीमाला न आल्याने आंबेडकरांची नाराजी

Anandraj Ambedkar On Koregaon Bhima : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे दरवर्षी शौर्य दिन साजरा करण्यात येतो, येथील विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पहाटेच येत असतात. मात्र, यंदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हजेरी लावली नसल्याने आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Anandraj Ambedkar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Anandraj AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 Jan : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे दरवर्षी शौर्य दिन साजरा करण्यात येतो, येथील विजयस्तंभला अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पहाटेच येत असतात. मात्र, यंदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हजेरी लावली नसल्याने आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, विजयस्तंभला भेट देण्यासाठी आता फक्त राज्यातूनच नव्हे तर पूर्ण देशभरातून लोक येत असतात. सर्वांसाठी ते एक श्रद्धेचे स्थान आहे. तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यांनी आज विजयस्तंभाला भेट दिली नाही याबाबत आनंदराज आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, "मुख्यमंत्री आणि उपुख्यमंत्री हे जनतेच्या मतावर निवडून आलेले आहेत. म्हणून ते आज त्या पदावर आहेत. उद्या नसतील त्यांना आजच्या दिवसाचं महत्व वाटत असेल तर त्यांनी यायला पाहिजे. जनतेला कुणीही आमंत्रित करत नाही.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Anandraj Ambedkar
Walmik Karad : अधिवेशन सुरू असताना वाल्मिक कराड नागपुरातच त्यानंतर थेट..., 22 दिवसांपासून कुठे होता गायब? धक्कादायक माहिती आली समोर

तरीदेखील देशभरातून आणि येतात त्यामुळे कोणत्याही आमंत्रणाशिवाय त्यांना या गोष्टीचे महत्त्व वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इथ येतील अशी अपेक्षा आहे, असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, पुण्यातील (Pune) कोरेगाव भीमा येथे आज 207 वा शौर्यदिन साजरा केला जात आहे. शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Anandraj Ambedkar
Mangal Prabhat Lodha: पालकमंत्री नियुक्ती आधीच प्रकल्पांची पळवा पळवी?

प्रशासकीय यंत्रणांचे चोख नियोजन करण्यात आले असून तगडा पोलिस (Police) बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विजय स्तंभावर लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आकर्षक फुलांच्या सजावटीसह रोषनाईही करण्यात आली आहे. विजयस्तंभाला यंदा संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com