Pune Crime News: कोयत्याची दहशत थांबेना, शाळेत विद्यार्थ्यावर हल्ला; पुण्यात नक्की चाललयं काय?

Koyata Gang: या कोयता गॅंगचे लोण आता शाळेपर्यंत पोहचले आहे.
Pune News
Pune NewsSarkarnama

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. या कोयता गॅंगचे लोण आता शाळेपर्यंत पोहचले आहे. पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेतील विद्यार्थ्यांवर दोन तरुणांनी कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समीर पठाण आणि विजय आरडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यामुळे शाळेत दहशतीचे वातावरण आहे. समीर पठाण हा तुळशीबागेत काम करतो तर विजय आरडे हा बारावीतील विद्यार्थी असून पद्मवती भागातील रहिवासी आहे. विजय आरडे बसस्टॉपवर समीर पठाणच्या मैत्रिणीशी बोलत उभा होता. आपल्या मैत्रिणीशी बोलत असल्याचे पाहून समीरला याचा राग आला आणि त्याने विजयवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात शेजारी उभा असलेला विद्यार्थीही जखमी झाला.

Pune News
'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्यगीत म्हणून घोषीत...

विद्यार्थ्यांमध्येच असा हल्ला झाल्याने वार झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. विशेष बाब म्हणजे सोमवारी (३० जानेवारी) पोलिसांनी या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना गुन्हेगारीबद्दल समुपदेशन केले होते. सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गॅंगने दहशत माजवली आहे.

छोट्या मोठ्या कारणांवरुन तरुणांकडून शस्त्रांस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात या घटना घडत आहेत. पण कोयता गॅंगची ही दहशत पाहून पुण्यात पोलिसांचा वचक राहिलाय की नाही, असे सवाल आता पुणेकरांकडून उपस्थित होऊ लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com